PM Narendra Modi Mumbai Visit : BKC वर पंतप्रधान मोदींची सभा, काय बोलणार याकडे लक्ष? ABP Majha
PM Narendra Modi Mumbai Visit : BKC वर पंतप्रधान मोदींची सभा, काय बोलणार याकडे लक्ष? ABP Majha
महाविकास आघाडी, शिवसेनेने केलेल्या कामांचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण, 'बीकेसी'मध्ये होणार जाहीर सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुरुवार, 19 जानेवारी रोजी मुंबईत येत असून त्यांच्या हस्ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या आणि शिवसेनेच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या महत्त्वाकांक्षी विकासकामांचे भूमिपूजन-लोकार्पण होणार आहे. या दौऱ्यात 'बीकेसी' येथे भव्य सभाही होणार आहे. त्यामुळे केवळ श्रेय लाटण्यासाठी आगामी महापालिका निवडणुका डोळय़ासमोर ठेवून पंतप्रधानांच्या दौऱयाचा घाट घातल्याचा हल्लाबोल 'महाविकास आघाडी'कडून 'मिंधे' गट आणि भाजपवर करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या नावाखाली 'मिंधे' सरकारकडून अनेक विकासकामांच्या भूमिपूजन-लोकार्पणाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र पालिकेच्या अखत्यारीत होणारी बहुतांशी कामे पालिकेत शिवसेनेच्या काळातच मार्गी लागली होती. यामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, रुग्णालयांचा पुनर्विकास, सिमेंट-काँक्रीटचे रस्ते, मेट्रो मार्ग आदी बहुतांशी कामे शिवसेना-महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम टप्प्यात आली होती. मात्र ही कामे सुरू होण्याच्या मार्गावर असताना या कामांचे श्रेय लाटण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन-लोकार्पण करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.