एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Worli Hit and Run : वरळी हिट अँड रन प्रकरणी मिहीर शाहाला 16 जुलैपर्यंत कोठडी

Worli Hit and Run : वरळी हिट अँड रन प्रकरणी मिहीर शाहाला 16 जुलैपर्यंत कोठडी   वरळी हिट अॅड रन प्रकरणातील (Worli Hit And Run Case) मुख्य आरोपी मिहीर शाहाला (Mihir Shah) शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गाडीची नंबर प्लेटही गहाळ झाली असून तिचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच आरोपीने ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी गाडीतच कापल्याचा पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. आरोपीला कोणी मदत केली याच तपस करायचा असून आरोपीच्या जास्तीत जास्त कस्टडीची मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली होती.  गुन्हा केल्यानंतर कारच्या नंबरप्लेटची विल्हेवाट कुठे लावली याची माहिती आरोपी देत नाही. तसेच त्याला पळून जाण्यासाठी कुणी मदत केली याचीही माहिती आरोपी देत नाही असा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आला. गुन्ह्यातील कार ही कोणाची आहे ,ती त्याला कुणी वापरायल दिली याच तपास होणे गरजचे आहे असं पोलिसांनी सांगितलं.   ओळख लपवण्यासाठी गाडीतच केस आणि दाढी काढली अपघात झाल्यानंतर आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी गाडीतच केस आणि दाढी कापल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. आरोपीच्या वडिलांनी अपघाताचा मुख्य पुरावा असलेली गाडी लपवण्याचा प्रयत्न केल्याचं तपासातून स्पष्ट झालं आहे.   आरोपी कुठल्याही थराला जावू शकतात. न्यायालयात सहानभूती मिळवण्यासाठी आरोपीकडून प्रयत्न सुरू आहे. वरळी अपघातात एका महिलेची हत्या झाली आहे. त्यामुळे पोलिसांना तपास करण्यासाठी आरोपीची जास्तीत जास्त कस्टडी मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.   कुठल्याही पुराव्याला धक्का नाही, मिहीरच्या वकिलांचा दावा सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर मिहीर शाहाच्या वकिलांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले की, यातील एका आरोपीला मंगळवारी हजर  केले आहे. आरोपीकडून तपासाला सहकार्य केलं जात आहे. तपासात 95 टक्के माहिती आणि पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. आम्ही कुठल्याही पुराव्यांना धक्का लावलेला नाही. आरोपीचे रक्ताचे नमुनेही घेतलेले आहे.   मिहीर शाहाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवून वरळीमधील अॅट्रिया मॉलजवळ कावेरी नाखवा या महिलेचा जीव घेतला होता. त्यानंतर तो फरार झाला. आता पोलिसांनी दोन दिवसांनंतर त्याला शहापूरमधून अटक केली.  दरम्यान, वरळी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून आरोपीचा फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Avinash Jadhav News:विधानसभेतील पराभवानंतर अविनाश जाधव यांचा मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
Avinash Jadhav News:विधानसभेतील पराभवानंतर अविनाश जाधव यांचा मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Avinash Jadhav News:विधानसभेतील पराभवानंतर अविनाश जाधव यांचा मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामाABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4 PM 01 December 2024ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 01 December 2024Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 डिसेंबर 2024  : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Embed widget