कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्पना भीक न घालता स्वत: विमान पाठवत नागरिकांना परत आणले, भारतीय मात्र हातपायात साखळदंड घालून कैद्यासारखे मायदेशात, 'स्वदेश रिटर्न'ची भयावह कहाणी
पंजाबमधील अमृतसरला पोहोचलेल्या लोकांना पोलिसांच्या वाहनातून त्यांच्या घरी पाठवण्यात आले. इतर राज्यांतील लोकांना विमानाने पाठवण्यात आले. हे सर्वजण अमेरिकेसह 20 देशांमध्ये कधीही जाऊ शकणार नाहीत.

Indian Migrants Deportation : अमेरिकेतून निर्वासित 104 भारतीयांना ( Indian Migrants Deportation) घेऊन आलेलं अमेरिकन सैन्याचे सी-17 विमान 5 फेब्रुवारी रोजी पंजाबमधील अमृतसर विमानतळावर उतरले. या लोकांच्या पायाला बेड्या बांधण्यात आल्या होत्या, तर त्यांच्या हातालाही बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. यूएस बॉर्डर पेट्रोल चीफ मायकेल बँक्स यांनी हा व्हिडिओ आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीयांच्या हातावर आणि पायावर बेड्या स्पष्टपणे दिसत आहेत. मायकेल बँक्स X वर लिहितात, यूएस बॉर्डर पेट्रोल यूएसबीपीने यशस्वीरित्या बेकायदेशीर एलियन्स भारतात पाठवले. लष्करी विमानाचा वापर करून केलेले हे आतापर्यंतचे सर्वात लांब उड्डाण होते. हे मिशन बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर काढण्याची आमची वचनबद्धता दर्शवते. जर तुम्ही बेकायदेशीरपणे सीमा ओलांडली तर तुम्हाला परत पाठवले जाईल.
पण आत बसलेल्या लोकांना विमानातून बाहेर पडू दिले नाही
अशाच अवस्थेत अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांना टेक्सासच्या सेंट अँटोनियो विमानतळावर लष्करी विमानात बसवले. तेथून भारतापर्यंत या लोकांनी बेड्या ठोकून 40 तासांचा प्रवास केला. काही लोकांनी मीडियाला सांगितले की, त्यांना विमानात एकाच जागी बसून राहण्यास सांगितले होते. वॉशरूममध्येही जाण्याची परवानगी नव्हती. लोकांनी आग्रह केल्यावर विमानातील कर्मचाऱ्यांनी त्यांना वॉशरूममध्ये नेले आणि दरवाजा उघडून आत ढकलले. लोकांनी सांगितले की त्यांना खूप कमी अन्न दिले जात होते, जे त्यांना हात बांधून खावे लागत होते. हद्दपार झालेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. विमानाने अमेरिका आणि भारत दरम्यान चार ठिकाणी इंधन भरण्यासाठी थांबा घेतला, पण आत बसलेल्या लोकांना विमानातून बाहेर पडू दिले नाही.
पंजाबमधील 30 आणि हरियाणा-गुजरातमधील प्रत्येकी 33 लोक
विमानात पंजाबमधील 30 आणि हरियाणा आणि गुजरातमधील प्रत्येकी 33 जणांचा समावेश होता. 45 अमेरिकन अधिकाऱ्यांनी त्यांना भारतात आणले. त्यांच्यासोबत 11 क्रू मेंबरही होते. अमृतसर विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, या लोकांची पडताळणी करून त्यांना इमिग्रेशन आणि कस्टम क्लिअरन्सनंतर पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या 104 अवैध स्थलांतरितांपैकी 48 जण 25 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. यात 4 वर्षाच्या मुलासह 13 अल्पवयीन आहेत. पंजाबमधील अमृतसरला पोहोचलेल्या लोकांना पोलिसांच्या वाहनातून त्यांच्या घरी पाठवण्यात आले. इतर राज्यांतील लोकांना विमानाने पाठवण्यात आले. हे सर्वजण अमेरिकेसह 20 देशांमध्ये कधीही जाऊ शकणार नाहीत.
अमेरिकेने प्रथमच लष्करी विमाने पाठवली
हे अमेरिकन लष्करी विमान भारतीय वेळेनुसार 4 फेब्रुवारीला पहाटे 3 वाजता सॅन अँटोनियो, अमेरिकेसाठी रवाना झाले होते. स्थलांतरितांना हद्दपार करण्यासाठी अमेरिकेने लष्करी विमानाचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकन हवाई दलाचे विमान सुमारे साडेतीन तासांनंतर परतले. यापूर्वी, वेगवेगळ्या अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला होता की अमेरिकेने एकूण 205 बेकायदेशीर भारतीयांना निर्वासित करण्यासाठी चिन्हांकित केले आहे. ते भारतात पाठवले जातील. 186 भारतीयांना डिपोर्ट करण्याची यादीही समोर आली आहे. उर्वरित लोक कुठे आहेत आणि त्यांना कधी पाठवले जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्रम्प यांनी बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बाहेरच्या लोकांना हद्दपार करण्याचे आदेश दिले होते. गुस्तावो पेट्रो यांनी ट्रम्प यांना गोऱ्यांचे गुलाम मालक" असे संबोधत घणाघाती प्रहार केला होता. ते म्हणाले की ट्रम्प त्यांना निम्न जातीचे मानतात, परंतु ते आणि इतर कोलंबियन असे नाहीत. तत्त्वांसाठी मरेन, पण ट्रम्प यांचा विरोध केला जाईल.
कोलंबियाने ट्रम्प धमक्यांना भीक घातली नाही
दरम्यान, कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी अमेरिकेत राहणाऱ्या अवैध स्थलांतरितांना देशात परतण्याचे आवाहन केले आहे. नी सोशल मीडियावर लिहिले की, अनधिकृत कोलंबियन लोकांना आवाहन करतो की त्यांनी त्या देशातील नोकऱ्या त्वरित सोडा आणि शक्य तितक्या लवकर कोलंबियाला परत या आणि देशाची उभारणी करा. ते म्हणाले की कोलंबिया सरकार कोलंबियाला परत येण्याची ऑफर स्वीकारणाऱ्या सर्वांना व्यवसायासाठी कर्ज देईल. तथापि, कोलंबियाला परतणाऱ्या लोकांना किती रक्कम मिळेल हे त्यांनी सांगितले नाही. प्यू रिसर्च सेंटरच्या मते, अमेरिकेत सुमारे 2 दशलक्ष अवैध कोलंबियन राहतात. कोलंबियाची लोकसंख्या ५ कोटींहून अधिक आहे. गुस्तावो पेट्रो हे कोलंबियाचे पहिले डावे राष्ट्राध्यक्ष आहेत. 2022 मध्ये ते देशाचे राष्ट्राध्यक्ष झाले. अमेरिकेत राहणाऱ्या लोकांना त्यांनी देशात परतण्याचे आवाहन केल्याने अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यामध्ये काहींनी पेट्रोचे समर्थन केले, तर काहींनी त्यांच्यावर टीकाही केली.
दोन अमेरिकन लष्करी विमानांना देशात उतरू दिले नाही
कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प मोठ्या संख्येने स्थलांतरितांना अमेरिकेत पाठवत आहेत, यावर ट्रम्प संतापले होते. यापैकी बरेच जण कोलंबियाचे आहेत. गेल्या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष पेट्रो आणि ट्रम्प यांच्यात याबाबत वाद निर्माण झाला होता. कोलंबियाने बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या दोन अमेरिकन लष्करी विमानांना देशात उतरू दिले नाही. यामुळे अमेरिका संतप्त झाली होती. यानंतर कोलंबियाने स्वत: विमान पाठवून नागरिकांना परत आणले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी कोलंबियावर 25 टक्के शुल्क लागू करण्याची घोषणा केली. यासोबतच पुढच्या आठवड्यापासून 50 टक्के दर लावण्याची धमकीही दिली. ट्रम्पच्या कारवाईला प्रतिसाद म्हणून, कोलंबियाने अमेरिकन सॅल्मनवर 25 टक्के शुल्क लादण्याची घोषणा केली. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये टॅरिफ वॉर सारखी परिस्थिती निर्माण झाली. मात्र, नंतर कोलंबियाने आपल्या निर्णयापासून माघार घेतली.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
