सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :29 सप्टेंबर 2024 : ABP Majha
सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 सप्टेंबर 2024 : ABP Majha
महायुतीच्या नेत्यांची वर्षा निवासस्थानी रात्री साडेचार तास बैठक, तीनही पक्षांनी दावा केलेल्या जागांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातल्या ११ हजार २०० कोटींच्या कामांचं करणार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन...पुणे मेट्रो आणि सोलापूर विमानतळाच्या लोकार्पणाचाही समावेश...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता, भंडाऱ्यातल्या मेळाव्यात अजित पवारांचं वक्तव्य, महायुती सरकारच्या योजनांची अजित पवारांनी केली उजळणी
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना वृत्तपत्रांत तीन वेळा जाहिरात द्यावी लागेल, गुन्हेगार उमेदवार का निवडला हे पक्षांना सांगावं लागेल...केंद्रीय निवडणूक आयोगचं कडक धोरण...
उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नागपूर दौऱ्यावर... पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची चर्चा
सोलापुरात रेशन दुकानांमधून प्लास्टिकच्या तांदळाचा पुरवठा, खासदार प्रणिती शिंदेंचा आरोप, पुरवठा अधिकाऱ्यांनी मात्र आरोप फेटाळले, तांदूळ गुणसंवर्धित असल्याचा दावा..