Temple Dress Code : राज्यातील 300 मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्याचा मंदिर महासंघाचा प्रयत्न
Temple Dress Code : राज्यातील 300 मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्याचा मंदिर महासंघाचा प्रयत्न
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मंदिरांमध्ये वस्त्र संहिता म्हणजेच ड्रेसकोड लागू करण्यास सुरूवात झालीय आणि त्यावरून तुळजाभवानी मंदिरातील प्रशासनाला टिकेले सामोरं जावं लागलं होतं. असाच वाद नागपूरमध्ये सुरू झालाय. नागपुरातील ४ मंदिरांमध्ये आजपासून वस्त्र संहिता लागू करण्यात आलीये. महाराष्ट्र मंदिर महासंघाने हा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता मंदिरात अंगप्रदर्शन, असभ्य, अशोभनीय आणि तोकडे कपडे घातल्यास प्रवेश दिला जाणार नाहीये. पहिल्या महिन्यात नागपुरातील 25 तर राज्यभरातील 300 मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्याच तुळजापूरमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आला होता. मात्र एक दिवसातच प्रशासनाला निर्णय बदलावा लागला. या पार्श्वभूमीवर महासंघाच्या निर्णयाला नागपुरातीलभाविक कसा प्रतिसाद देतात, हे पहावं लागणार आहे.