Pooja Chavan Case | कुटुंबियांची बदनामी थांबवा अन्यथा आत्महत्या करु : पूजाचे वडिल 'माझा'वर EXCLUSIVE
पूजाची बदनामी थांबवा नाही तर कुटुंबासह आम्हाला आत्महत्या करावी, अशी उद्विग्न प्रतिक्रिया पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी दिली आहे. ते म्हणाले की, "रोज वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप, फोटोग्राफ बदनामी करण्याच्या उद्देशाने येत आहेत. पूजाला न्याय मिळाला पाहिजे पण कृपया तिची बदनामी मीडियाने, सोशल मीडियाने थांबवावी. पूजा ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय कार्यकर्ते होती पण एकाच व्यक्तीसोबत तिचे फोटो हेतुपुरस्सर व्हायरल केले जात आहेत. आमच्या घरामध्ये बहिणी आहेत. या सगळ्या रोजच्या बातम्या आणि वायरल होणाऱ्या फोटोमुळे आमच्या कुटुंबाला आता होणारा त्रास सहन होत नाही. पूजाला न्याय मिळाला पाहिजे मात्र राजकारण थांबवा."






















