एक्स्प्लोर
Advertisement
ST Workers Strike : एसटी संपाबाबत परिवहन मंत्री अनिल परबांनी दिलेला अल्टीमेटम आज संपतोय ABP Majha
गेल्या महिन्याभराहून जास्त काळ सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप थांबलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांसोबतच प्रवाशांना देखील मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पगारवाढ आणि वेतन हमीसारख्या मागण्या मान्य केल्यानंतर देखील आंदोलक कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. कामावर न परतणाऱ्या जवळपास १० हजार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना शेवटचा अल्टिमेटम देण्यात आला होता. संपाबाबत परिवहन मंत्री अनिल परबांनी दिलेला अल्टीमेटम आज संपतोय. सोमवार पर्यंत कामावर या अन्यथा मेस्मा अंतर्गत कारवाई करू असा इशारा संपकरी कर्मचाऱ्यांना देण्यात आला होता. परंतु एसटी कर्मचारी अजूनही विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. आतापर्यंत एसटीचं साधारण 550 कोटीचं नुकसान झालं आहे.
महाराष्ट्र
राज ठाकरेंचा पक्ष महायुतीत नाही, मी माहीममधून लढणारच
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement