Nilesh Lanke on Sharad Pawar : पांडुरंग भेटला! शरद पवारांच्या भेटीनंतर निलेश लंकेंची प्रतिक्रिया
Nilesh Lanke on Sharad Pawar : पांडुरंग भेटला! शरद पवारांच्या भेटीनंतर निलेश लंकेंची प्रतिक्रिया
शरद पवारांना भेटल्यानंतर पांडुरंग भेटला असं वाटतं ऊर्जा घेऊन आम्ही इथून जातो दोन पाडवे होतात हे मला आत्ताच कळालं ऐकून वाईट वाटलं नगरमध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा महाविकास आघाडीच्या येतील
हे ही वाचा...
गेल्या काही दिवसांपासून माहीम विधानसभा मतदारसंघ (Mahim Assembly Constituency) चांगलाच चर्चेत आला आहे. कारण या मतदारसंघातून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठामच आहेत.
याबाबत माहीम विधानसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केले आहे. माहीममधून आमचे गेल्या 3 ते 4 टर्म पासून आमदार आहे, ते आमचे जुने कार्यकर्ते आहेत. ते तिथले आमदार आहेत, त्यांच्याशी देखील मी चर्चा केली. मात्र माहिममधील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आक्रमक आहेत. त्यांना निवडणूक लढायची आहे. कार्यकर्त्यांकडे देखील आम्हाला लक्ष द्यावं लागेल, असे त्यांनी म्हटले. आता मनसेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीकेची पहिली तोफ धडाडली आहे. त्यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघाचा वाद तापल्याचे दिसून येत आहे.