एक्स्प्लोर

संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  

VBA Answer to Sanjay Raut : वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर पलटवार केला आहे.

मुंबई : माझे संजय राऊत यांना आवाहन आहे की, ओबीसीचे राजकीय आरक्षण तुम्ही संपवले की नाही ते सांगा ? क्रिमीलेयरचा निर्णय लागू झाल्यावर एससी, एसटी यातून बाद होणार की नाही ते सांगा ? बाळासाहेब जे सांगत आहेत त्याला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करू नका. जनतेला तुमचे खरे चेहरे आता दिसू लागल्याचे वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मोकळे यांनी म्हटले आहे की, बाळासाहेबांनी सकाळी रुग्णालयातून आयसीयूमध्ये असताना जनतेसाठी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. ज्यामध्ये त्यांनी मतदारांना आणि जनतेला आवाहन केले आहे की, जर ओबीसी, एससी, एसटी यांचे आरक्षण वाचवायचे असेल तर या निवडणुकीत योग्य भूमिका घ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे रहा.  त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, बाळासाहेबांचे हे विधान सत्यावर आधारित नाही. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. महाराष्ट्र आम्ही सांभाळू. महाराष्ट्र सांभाळण्याच्या गप्पा मारणाऱ्या संजय राऊत यांना सांगायचं आहे की, बाळासाहेबांची विधाने ही तथ्यावर आणि सत्यावर आधारित आहेत. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षानंतरच्या सत्तेनंतर महायुती सत्तेत आली. या दोघांच्या कार्यकाळात ओबीसीचे राजकीय आरक्षण यांनी वाचवले नाही,असं सिद्धार्थ मोकळे म्हणाले. 

ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले आहे. तुमच्या हातात असताना सुद्धा, तुम्हाला शक्य असताना सुद्धा तुम्ही न्यायालयासमोर योग्य डेटा आणि आकडेवारी देणे गरजेचे होते ती तुम्ही दिली नाही यावरून तुमची आरक्षणाच्या बाबतीतील नियत उघड झाली असल्याचेही मोकळे यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयाने एससी, एसटी आरक्षणात क्रिमीलेयर लागू करण्याचा निर्णय दिला. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी त्याचे वाजत-गाजत स्वागत केले. हा निर्णय लागू करणारे पहिले राज्य आमचे असेल अशी वल्गना केली. त्यांनी त्या संदर्भात समित्या सुद्धा जाहीर केल्या. उत्तरेत भाजपने तो निर्णय लागू करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात सुद्धा शेवटच्या दिवशी आचारसंहिता लागण्यापूर्वी शिंदे सरकारने या निर्णयासंदर्भात समिती गठीत केली आहे. महाविकास आघाडीतील एकाही पक्षाने संजय राऊत यांच्या सकट कोणीही याला विरोध केला नसल्याचे मोकळे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

जर क्रिमीलेयर लागू झाले, तर एकदा आरक्षणाचा लाभ घेतलेल्या कुटुंबाला आरक्षणातून वगळण्यात येणार आहे. म्हणजेच त्या कुटुंबासाठी आरक्षण संपणार आहे. ही वस्तूस्थिती बाळासाहेब आयसीयूमध्ये असताना सुद्धा मांडत आहेत. ते यांना झोंबणे स्वाभाविक आहे; पण याचे खंडन त्यांना करता येत नाही. म्हणून बाळासाहेबांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न हे करत असल्याची टीका मोकळे यांनी केली. 

ओबीसी आरक्षण संपवलं की नाही ते सांगा : सिद्धार्थ मोकळे

संजय राऊत यांना आवाहन करत मोकळे यांनी म्हटले की, ओबीसीचे राजकीय आरक्षण तुम्ही संपवले की, नाही ते सांगा ? क्रिमीलेयरचा निर्णय लागू झाल्यावर एससी, एसटी यातून बाद होणार की, नाही ते सांगा ? बाळासाहेब जे सांगत आहेत त्याला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करू नका. जनतेला तुमचे खरे चेहरे आता दिसू लागले आहेत. त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होणार आहे याची भीती तुम्हाला आहे. त्यामुळे बाळासाहेबांवर तुम्ही उलट सुलट आरोप करणार आहात, ते आम्हाला माहिती आहे. पण जनता आता दुधखुळी राहिली नाही. आरक्षणाच्या संदर्भातील तुमच्या भूमिका आम्ही उघड करणार आहोत आणि जनतेला सत्य सांगत राहणार आहोत.

इतर बातम्या :

Sanjay Raut: प्रकाश आंबेडकरांनी ICU मधून भ्रम पसरवू नये, छातीवर ताण येईल अशी वक्तव्ये ICU मधून करु नयेत : संजय राऊत

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Ajit Pawar: अजित पवारांच्या मुलाला सोडलं तर कुणाला काही फुकटचं नको; शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवतोय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
अजित पवारांच्या मुलाला सोडलं तर कुणाला काही फुकटचं नको; शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवतोय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Pune Accident News: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरा, नायतर बॅलेटपेपरवर घ्या, याचिकेवर सुनावणी; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस
निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरा, नायतर बॅलेटपेपरवर घ्या, याचिकेवर सुनावणी; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस
कोल्हापूरकरांचा नाद खुळा, उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून; वरबापाने सांगितलं कारण काय?
कोल्हापूरकरांचा नाद खुळा, उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून; वरबापाने सांगितलं कारण काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC : सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा - उद्धव ठाकरे
World Record: 'नवा विश्वविक्रम स्थापन करण्याचा प्रयत्न', Nagpur मध्ये 52,732 विद्यार्थ्यांचे सामूहिक गीतापठण
Viral Video : कोल्हापूरात 'JCB'तून नवदाम्पत्याची वरात, 'जगात भारी कोल्हापुरी' थाट पाहून सगळेच अवाक्
Animal Cruelty: 'ओंकार हत्तीवर सुतळी बॉम्बने हल्ला', Sindhudurg मधील संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल
Pune Accident: कामगारांना घेऊन जाणारा पिकअप टेम्पो उलटला, आठ मजूर गंभीर जखमी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Ajit Pawar: अजित पवारांच्या मुलाला सोडलं तर कुणाला काही फुकटचं नको; शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवतोय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
अजित पवारांच्या मुलाला सोडलं तर कुणाला काही फुकटचं नको; शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवतोय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Pune Accident News: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरा, नायतर बॅलेटपेपरवर घ्या, याचिकेवर सुनावणी; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस
निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरा, नायतर बॅलेटपेपरवर घ्या, याचिकेवर सुनावणी; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस
कोल्हापूरकरांचा नाद खुळा, उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून; वरबापाने सांगितलं कारण काय?
कोल्हापूरकरांचा नाद खुळा, उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून; वरबापाने सांगितलं कारण काय?
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Radhakrishna Vikhe Patil: 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
Tiger Attack: वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
Ambadad Danve on Ajit Pawar: व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
Embed widget