Belgaum Election Result : ...हा तर आसुरी आनंद, Sanjay Raut यांचा भाजपवर निशाणा : ABP Majha
बेळगाव : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीचा (Belgaum Municipal Corporation Election) निकाल घोषित झाला. या निकालात भाजपनं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. एकहाती सत्ता काबिज करत बेळगाव महापालिकेवर कमळ फुलवलं आहे. भाजपनं महाराष्ट्र एकीकरण समितीचा धुव्वा उडवत सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत भाजपनं 35 काँग्रेसनं 10, अपक्ष 8, महाराष्ट्र एकीकरण समिती 4 आणि एम आय एम एक असे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपाला जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल देत सत्ता सोपवली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला या निवडणुकीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे 32 सदस्य आधीच्या सभागृहात होते. तर कन्नड उर्दू गटाचे 36 सदस्य होते. भाजपनं निर्विवाद वर्चस्व सिद्ध मिळवल्यानं भाजपनं मोठा जल्लोष केला. पण मराठी माणसाला हरवल्याचा हा तर आसुरी आनंद अशी टीका Sanjay Raut यांनी भाजपवर केली आहे.
![Pruthviraj Mohol wins 67th Maharashtra Kesari | पृथ्वीराज मोहोळ ठरला 67 वा महाराष्ट्र केसरी, सोलापूरचा महेंद्र गायकवाड अखेरच्या क्षणी चितपट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/8a067d59de30b900b9bc8c362ca356e51738513192631977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Shivraj Rakshe Maharashtra Kesari Rada | शिवराज राक्षेचा पराभव, पंचांना लाथ मारली, स्पर्धेत गोंधळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/6c348c85d3591f71c8c8c0725c2121a21738505239495977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 02 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/0ae2f6efc5bb1340638f1ca2f7500d3b1738494673072977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 02 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/ab810485bb099ce34826c0b21dbc039f1738492089792977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Dhananjay Deshmukh Bhagwangad : धनंजय देशमुख-नामदेव शास्त्री यांच्यातील संपूर्ण संभाषण जसंच्या तसं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/fbd634113ce29c848ffa78983a83fecc1738489862682718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)