Ravikant Tupkar hunger Strike : रविकांत तुपकर यांच्या घराभोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त ABP Majha
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. सोयाबीन आणि कापसाला भाव मिळावा यासाठी तुपकरांनी सुरु केलेल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. अन्नत्याग आंदोलनामुळे काल तुपकर यांची प्रकृती खालावली. त्यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. प्रशासनाकडून कोणत्याही प्रतिसाद न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. एका संतप्त कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यानंतर हे आंदोलन आणखी चिघळलं. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मलकापूर-औरंगाबाद राज्य महामार्गावर रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांच्या गाडीच्या काचाही यावेळी फोडण्यात आल्या. यानंतर तुपकरांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवलाय. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी करण्यात येतेय. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज


















