एक्स्प्लोर
'या' दोन्ही सरकारच्या काळात कर्जमाफी झालीच नाही; उद्विग्न शेतकऱ्याने शेतात लावला मोठा फ्लेक्स
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भिलखेड येथील अल्पभूधारक शेतकरी नीलकंठ लिपते यांनी आपल्या शेताच्या बांधावर लावलेल्या फ्लेक्सची चर्चा सध्या परिसरात रंगली आहे. नीलकंठ हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांची भिलखेड येथे 2 एकर शेती आहे. त्यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्र संग्रामपूर शाखेचं 2011 पासून एक लाख 48 हजाराचं कर्ज आहे. यापूर्वी त्यांनी फडणवीस सरकारच्या काळात कर्जमाफी साठी अर्ज केला होता व आताही वर्तमान ठाकरे सरकारच्या काळातील कर्जमाफी व शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज केला होता पण दोन्ही सरकारच्या काळात त्याना कर्जमाफी झाली नाही. त्यामुळे त्यांनी उद्विग्न होऊन आपल्या शेतातील बांधावर मोठा फ्लेक्स लावलाय. त्यावर "फसवी कर्जमाफी" तसंच " या दोन्ही सरकारच्या काळात मला कर्जमाफी झालीच नाही" असा उल्लेख करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटोही लावले आहेत. .या भिलखेड गावात जवळपास 60 टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच नसल्याचं गावातील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र

Karuna Munde On Dhananjay Munde :1996 पासूनचं सगळं बाहेर काढणार! करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना इशारा

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 07 February 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

Uddhav Thackeray Mumbai Speech : कोकणची ट्रेन गोरखपूरला वळवली,उद्धव ठाकरेंनी दिला थेट इशारा

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 07 February 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स

Amol Mitkari Akola : बेघर निवारा केंद्राची मिटकरींकडून पाहणी,नागरिकांच्या समस्यांचा आढावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
अहमदनगर
भारत
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement