Ajit Pawar on Sharad Pawar : पवारांकडून नक्कल, अजितदादा म्हणतात, हे कुणालाही आवडलं नाही...
Ajit Pawar on Sharad Pawar : पवारांकडून नक्कल, अजितदादा म्हणतात, हे कुणालाही आवडलं नाही...
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बारामती विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ काल कण्हेरी येथे शरद पवार (Sharad Pawar) यांची सभा झाली. या सभेमध्ये शरद पवार यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या रडण्याची नक्कल केली. शरद पवारांनी अजित पवारांची केलेल्या नक्कलेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. याचदरम्यान शरद पवारांनी केलेल्या 'नक्कल'वर अजित पवार यांनी एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' प्रतिक्रिया दिली.
शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहे. प्रगल्भ नेते आहेत. त्यामुळे प्रगल्भ नेत्याने माझ्यासारख्या मुलाप्रमाणे असलेल्या माझी नक्कल करणे, साहेबांनी नक्कल करणे अनेकांना आवडलं नाही. युगेंद्र पवारांनी किंवा इतरांनी केलं असतं तर ठीक होतं, असं अजित पवारांनी सांगितले. इतके दिवस वाटत होतं राज ठाकरेच नक्कल करतात, पण काल साहेब ही दिसले, असं अजित पवार म्हणाले. मी शरद पवार साहेबांना देव मानलं. त्यांनी माझी नक्कल केली. मी घरचा मुलगा होतो. माझी नक्कल त्यांनी करणे योग्य नव्हतं, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.