(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 09 PM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 09 PM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यातल्या 13 जागांसाठी उद्या मतदान.. महामुंबईसह ठाणे, कल्याण, नाशिकमधील लढतीकडे सर्वांचं लक्ष.
मुंबईतील ३ मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना, तर नाशिक, ठाणे, कल्याणमध्येही मशाल विरुद्ध धनुष्यबाण
मतदान केंद्र आणि १०० मीटर परिसरात मोबाईल नेण्यास प्रतिबंध, मतदान केंद्रावरील गोपनीयतेसाठी बंदी.
अजित पवार नवखे असल्यामुळे २००४ मध्ये त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिलं नाही, शरद पवारांचा गौप्यस्फोट...इतर कुुणाला मुख्यमंत्रिपद दिलं असतं तर पक्ष फुटला असता, पवारांचा दावा.
अनेक मंत्रीपदं दिली त्यामुळे पक्षात संधी मिळाली नाही ही अजितदादांची ओरड निरर्थक... शरद पवारांचे खडे बोल...सुप्रिया आणि अजितदादांमध्ये भेद केला नाही, पवारांचं स्पष्टीकरण.
पक्ष फुटला नसता तर 2004 मध्ये मीच मुख्यमंत्री झालो असतो... शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया.
2004 पासूनच भाजपसोबत जाण्यासाठी प्रफुल पटेल आग्रही होते, पवारांचा गौप्यस्फोट...आग्रह होता, पण आदर म्हणून पवारांसोबत राहिलो, पटेलांचं स्पष्टीकरण.
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायला आमची हरकत नव्हती, शरद पवारांचं विधान.. तर शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल.