Indian Army Full PC : मी पुन्हा सांगते...आम्ही अजूनही सतर्क आहोत; पाकिस्तान आर्मीला सज्जड दम!
Indian Army Full PC : मी पुन्हा सांगते...आम्ही अजूनही सतर्क आहोत; पाकिस्तान आर्मीला सज्जड दम!
भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांकडून शस्त्रसंधीवर सहमती दर्शवण्यात आली आहे. पाकिस्तानच्या डीजीएमओ यांनी भारताच्या डीजीएमओ यांना दुपारी 3.30 वाजता फोन करण्यात आला. यानंतर दोन्ही देशांकडून गोळीबार, जमीनीवरुन हल्ले, हवाई आणि सागरी कारवाया आज सायंकाळी 5.00 वाजल्यापासून थांबवण्यात आल्याची माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांनी दिली. यानंतर भारताच्या तिन्ही संरक्षण दलांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये नौदलातर्फे रघू आर नायर, हवाई दलातर्फे विंग कमांडर व्योमिका सिंग आणि इंडियन आर्मीकडून कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्ताकडून राबवण्यात येत असलेल्या मिसइन्फॉरमेशन कॅम्पेनचा बुरखा फाडण्यात आला. यावेळी सोफिया कुरेशी यांनी भारत निधर्मी देश आहे, भारतानं मशिदीवर हल्ला केला नाही, असं त्यांनी सांगितलं.
कर्नल सोफिया कुरेशींनी ठणकावून सांगितलं की भारताकडून एकाही मशिदीवर हल्ला करण्यात आलेला नाही. सोफिया कुरेशी यांनी पाकच्या फेक न्यूजचा पुन्हा बुरखा फाडला. सोफिया कुरेशी पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हटलं की, पाकिस्तानकडून मिस इन्फोर्रमेशन कॅम्पेन राबवलं जात होतं.





















