एक्स्प्लोर

MS Dhoni IND vs NZ Final : ज्याने भारताला विश्वविजेता बनवलं, तो धोनी पहिल्यांदाच प्रेक्षक बनून पाहणार फायनल, IND vs NZ सामन्याला कडक बंदोबस्त, पाहा व्हिडिओ

MS Dhoni arrives in Ahmedabad : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना आज 8 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल.

MS Dhoni arrives in Ahmedabad : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना आज 8 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल. दरम्यान, भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबादला पोहोचला आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या या महत्त्वाच्या सामन्यात धोनी प्रथमच प्रेक्षक म्हणून स्टेडियममध्ये उपस्थित राहून भारताचा अंतिम सामना पाहताना दिसणार आहेत.

याआधीही आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या सेमीफायनल सामन्यात धोनी उपस्थित होता. इंग्लंडविरुद्धच्या त्या रोमांचक सेमीफायनलमध्ये त्याने स्टँडमधून भारतीय संघाला पाठिंबा दिला होता. आता स्पर्धेतील सर्वात मोठा सामना पाहण्यासाठी तो अहमदाबादला पोहोचला आहे.

सेमीफायनलला अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती

वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या सेमीफायनल सामन्यात एमएस धोनी आपल्या पत्नी साक्षी धोनीसोबत उपस्थित होता. त्याचप्रमाणे भारताचा माजी टी-20 कर्णधार रोहित शर्माही पत्नीसमवेत स्टेडियममध्ये दिसला. याशिवाय बॉलिवूडमधील अनेक मोठे कलाकारही त्या सामन्यासाठी उपस्थित होते. रणबीर कपूर, आलिया भट्ट, वरुण धवन आणि अनिल कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी प्रेक्षकांमध्ये दिसले. भारताने थरारक विजय मिळवत अंतिम फेरी गाठली तेव्हा स्टेडियममध्ये उत्साहाचा माहोल होता.

अंतिम सामन्यासाठीही मोठ्या उपस्थितीची शक्यता

आता महान यष्टिरक्षक-फलंदाज एमएस धोनी अहमदाबादला पोहोचले आहेत. येथे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध टी-20 वर्ल्ड कपचे विजेतेपद कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. सुमारे सवा लाख प्रेक्षक क्षमता असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना पाहण्यासाठी देशभरातील अनेक मोठ्या व्यक्ती आणि सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वांच्या नजरा आता या महामुकाबल्याकडे लागल्या आहेत.

अहमदाबादमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाने वर्चस्व... 

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकूण 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, जिथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले आहे. या मैदानावर खेळल्या गेलेल्या 17 सामन्यांपैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 11 वेळा विजय मिळवला आहे, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने सहा वेळा विजय मिळवला आहे. या मैदानावर पहिल्या डावात सरासरी 170 ते 175 धावा केल्या आहेत. येथील सर्वोच्च धावसंख्या 234 धावा आहे, जो टीम इंडियाच्या नावावर आहे, जो त्यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मिळवला होता. भारतीय संघाने अहमदाबादमध्ये आतापर्यंत 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी 7 जिंकले आहेत आणि फक्त तीन गमावले आहेत.

हे ही वाचा -

IND W vs AUS W Pink-ball Test : 3 दिवसही टिकली नाही टीम इंडिया! पिंक बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा 10 विकेट्सनी विजय, मालिकाही हातची गेली

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
Nitish Rana Emotional DPL VIDEO : 27 चेंडूत अर्धशतक... आकाशाकडे बघताच दिवंगत आईची आठवण अन् पुढच्याच क्षणी अश्रूंचा बांध फुटला! नीतीश राणाचा काळजाला भिडणारा VIDEO
27 चेंडूत अर्धशतक... आकाशाकडे बघताच दिवंगत आईची आठवण अन् पुढच्याच क्षणी अश्रूंचा बांध फुटला! नीतीश राणाचा काळजाला भिडणारा VIDEO
IND vs SL 1st TEST : भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत श्रीलंकेच्या प्लेइंग-11मध्ये मोठा बदल, दिनेश चंडिमल OUT; 26 वर्षीय खेळाडूचा थेट डेब्यू
भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत श्रीलंकेच्या प्लेइंग-11मध्ये मोठा बदल, दिनेश चंडिमल OUT; 26 वर्षीय खेळाडूचा थेट डेब्यू

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget