Beed Railway : नगर,बीडवासियांचं स्वप्न साकार होणार, रेल्वे राज्यमंत्रीही उपस्थित राहणार : ABP Majha
मराठवाड्यातील नागरिकांसाठी एक चांगली बातमी आहे. बीड जिल्हावासियांच्या दृष्टीनं जवळच असलेल्या परळी-बीड-नगर रेल्वे मार्गावर आज पहिल्यांदाच नगर ते आष्टी प्रवासी रेल्वे धावणार आहे. अहमदनगर ते आष्टी या ६६ किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू होतोय.. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेचा शुभारंभ होईल. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून वारंवार पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या... आणि आज याच आष्टी ते अहमदनगर रेल्वे मार्गाच्या उद्घटनासाठी फडणवीस आणि पंकजा मुंडे या एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत... तसंच बीडच्या खासदार प्रीतम मुंडेही उपस्थित राहतील.























