Beed : Sharad Pawar यांच्या सभेनंतर Ajit Pawar यांची उत्तर सभा, अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष
अजित दादांनी शरद पवारांची साथ सोडली आणि भाजप सोबत घरोबा केला...राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काका-पुतण्यांनी राज्यभर सभांचा धडाका लावलाय. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी बीडमध्ये सभा घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यानंतर आज बीडमध्ये अजित पवारांची जाहीर सभा होणार आहे.. अजित पवारांच्या स्वागतासाठी बीड शहरात भव्य बॅनर्स आणि स्वागत कमान उभारण्यात आले आहेत. आज दुपारी 2 वाजता अजित पवारांसह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री हॅलिकॉप्टरने बीडच्या पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर उतरतील. आणि तिथून अमरसिंह पंडित यांच्या निवासस्थानी सर्व जण भोजनासाठी जातील. आज संध्याकाळी 5.30 वाजता सभेला सुरुवात होईल. सभेसाठी बीड शहरात असलेल्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावर भव्य असा वॉटरप्रूफ मंडप देखील उभारण्यात आलाय. त्यामुळे बीडमधील शरद पवारांच्या सभेनंतर अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..