(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Narendra Modi visits Kedarnath Temple | नरेंद्र मोदी यांच्याकडून केदारनाथचं दर्शन | उत्तराखंड | ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात चौथ्यांदा केदारनाथचं दर्शन घेतलं. मागील दीड महिन्यापासून सुरु असलेली निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. त्यामुळे थकवा दूर करण्यासाठी आणि देवदर्शनासाठी मोदी केदारनाथला पोहोचले. यावेळी मोदींनी रुद्राभिषेक करुन शिव आराधना केली.
याआधी नरेंद्र मोदींनी केदारनाथला जाताना एकदाही काठीचा वापर केला नव्हता. मात्र आजच्या दौऱ्यात पहिल्यांदा नरेंद्र मोदी काठी हातात घेऊन केदारनाथच्या दर्शनाला पोहोचले.
मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर केदारनाथच्या तीर्थ पुरोहितांनी मोदींचं स्वागत केलं. त्यानंतर पूजा करण्यासाठी नरेंद्र मोदींनी मंदिरात प्रवेश केला. जवळपास अर्धा तासाच्या पूजेनंतर मोदींनी केदारनाथ मंदिराला प्रदक्षिणा घातली आणि तेथे उपस्थित असलेल्या भक्तांना हात दाखवत अभिवादन केलं. उद्या म्हणजे रविवारी नरेंद्र मोदी बद्रीनाथचा दौरा करणार आहेत.