एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : जे. डे हत्या प्रकरण, छोटा राजनसह सर्व आरोपींना जन्मठेप
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार ज्योर्तिमय डे यांच्या हत्येप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह सर्व 9 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मुंबईतील विशेष मकोका कोर्टाने हा निर्णय दिला.
छोटा राजन, सतीश काल्या, अभिजीत शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगरवाल आणि दीपक सिसोडीया हे नऊ जण दोषी सिद्ध झाले आहेत. या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
पुरावे आणि साक्षीनुसार छोटा राजन हा जे डेंच्या हत्येचा कट रचणारा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं होतं. छोटा राजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात उपस्थित होता.
जे डे हत्या प्रकरणी 13 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा फरार आहे. उर्वरित 11 जणांपैकी जोसेफ पॉलसन आणि जिग्ना वोरा या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण सिद्ध झाल्यास छोटा राजनला फाशीची शिक्षा सुनावली जाऊ शकते, पण ती शक्यता कमी होती. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली
काय आहे प्रकरण?
छोटा राजन आणि दाऊद इब्राहिम यांच्यातील गँगवारच्या वादात अनेकांचे बळी गेले आहेत. याच वादाचा बळी जे डेही ठरले होते. 11 जून 2011 रोजी मुंबईतील पवईमध्ये हिरानंदानी परिसरात जे डे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
जे डे यांची हत्या छोटा राजन गँगमार्फत करण्यात आल्याचं समोर आलं होतं. या हत्येमध्ये पत्रकार जिग्ना वोराचं नावसुद्धा जोडलं गेलं होतं. जे डे यांच्या हत्येमुळे संपूर्ण मीडिया विश्वात खळबळ माजली होती.
पुरावे आणि साक्षीनुसार, छोटा राजन हा जे डेंच्या हत्येचा कट रचणारा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं. तर, राजनच्या संभाषणात जिग्ना वोराचा उल्लेख होता. जिग्नाच्या सीडीआर पुराव्यानुसार ती छोटा राजनच्या सातत्याने संपर्कात असल्याचं आढळून आलं.

महाराष्ट्र
Sada Sarvankar EXCLUSIVE : शिदेंसोबतच्या बैठकीत काय झालं ? उमेदवारी मागे घेणार?
Nana Kate on Maval| बंडखोरी मागे घ्यावी का? हाच नियम मावळमध्ये भाजपाने पाळावा, नाना काटेंचा नवा डाव
4 दुपारी २ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 02 PM 4 नोव्हेबंर 2024
Nawab Malik : उमेदवारी मागे घेण्यास मलिकांचा नकार, निवडणूक लढणार
दुपारी १२ च्या हेडलाईन्स 01PM TOP Headlines 01 PM 02 November 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
लातूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement