Dada Bhuse On Marathi School : मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर? शालेय शिक्षणमंत्री काय म्हणाले?
Dada Bhuse On Marathi School : मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर? शालेय शिक्षणमंत्री काय म्हणाले?
जिल्हा परिषदच्या शाळांच्या सामूहिकीकरणावर अजून कोणताही निर्णय झाला नाही, मात्र आम्ही तज्ज्ञांकडून व पालकांकडून यावर मत मागवली असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. शाळा बंद पाडणे हा आमचा उद्देश नाही तर विध्यर्थ्यांचे हित हा आमचा केंद्रबिंदू असून विदयार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल असे दादा भुसे म्हणाले . समूहात घेतलेले शिक्षण हे कधीही विदयार्थ्यांच्या फायद्याचे असते त्यामुळे आम्ही कमी पटसंख्या असलेल्या शाळांना इतर शाळांशी जोडण्यावर विचार करत असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले. ज्या भागात वाघांची दहशत आहे त्या भागात शाळेच्या वेळत बदल करणे किंवा एसटी सुविधा पुरवणे हि समस्या सुरु शकेल का यावर विचार करत असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.























