एक्स्प्लोर
सिनेमागृह खुली झाली असली तरी नाट्यनिर्मात्यांचं सध्या वेट अँड वॉच, कशी सुरू आहे सिनेमागृहांची तयारी?
जागतिक रंगभूमीदिनी समस्त नाट्यकर्मींना एक चांगली बातमी मिळाली ती नाट्यगृहं सुरु होण्याबाबतची. गेल्या मार्चपासून बंद झालेली थिएटर्स अखेर आता सुरु होणार आहेत. असं असलं तरी नाट्यनिर्मात्यांनी मात्र सध्या वेट एंड वॉचची भूमिका घेतली आहे. कारण सर्वसाधारणपणे अनलॉक होताना काही अटी शर्ती राज्य सरकारतर्फे घातल्या जातात. सर्वांनी या अटींचं पालन करणं अपेक्षित असतं. नाट्यगृहं सुरु करत असतानाच अशा कोणत्याही अटी अद्याप सरकारने जाहीर केलेल्या नाहीत. अपवाद 50 टक्के प्रेक्षकसंख्येचा. या अटीशर्ती ज्याला एसओपी म्हणतात. त्या जोवर येत नाहीत तोवर थांबण्याचा निर्णय नाट्यवर्तुळाने घेतला आहे. अर्थात माननीय मुख्यमंत्र्यांनी आज गुरुवारी नाट्यनिर्मात्यांशी संवाद साधून त्यांची बाजू ऐकून घेतली आहे. यावेळी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुखही उपस्थित होते.
आणखी पाहा


















