Ayatollah Khomeini Special Reportखामेनींच्या हत्येनंतर जगातून प्रतिक्रिया,युद्ध भडकणार की युद्धबंदी?
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेंनीच्या मृत्यूनंतर आता जगभरातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झालीय. खामेनींच्या रुपानं जगातील दुष्ट शक्तीचा नाश झाल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत, तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी मात्र हा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन असल्याचं म्हटलंय. अमेरिकेतील न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनीही या हल्ल्याचा निषेध केलाय. खामेनींच्या हत्येनंतर जग कसं विभागलं जातंय, हे दाखवणाऱ्या जगभरातील प्रतिक्रियांचा आढावा घेऊया, या स्पेशल रिपोर्टमधून.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात मृत्यू झालाय. अमेरिकेनं इस्रायलसोबत केलेल्या या संयुक्त कारवाईत खामेनी यांच्या कुटुंबातील इतर चार सदस्यांनाही आपले प्राण गमवावे लागले या घटनेनंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटतायत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचं समर्थन करत इराणच्या सैन्यदलांना गर्भित इशारा दिलाय. आपल्या ट्रूथ सोशल या प्लॅटफॉर्मवरून ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलंय पाहा..
डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया
खामेनी या जगातील एका दुष्ट व्यक्तीचा मृत्यू झालाय. यामुळे केवळ इराणच्या नागरिकांनाच नाही, तर अमेरिकेच्या नागरिकांनाही न्याय मिळाला आहे. जगातील इतर अनेक देशांनाही यामुळे न्याय मिळाला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या यंत्रणेसमोर खामेनी आणि त्यांची यंत्रणा काहीही करू शकली नाही. आपल्या देशाचा ताबा घेण्याची ही इराणी नागरिकांसाठी सर्वात मोठी संधी आहे. इराणच्या संरक्षण यंत्रणा आम्हाला शरण येऊ शकतात किंवा मृत्यू पत्करू शकतात. जोपर्यंत आवश्यकता वाटेल, तोपर्यंत आमचे हल्ले सुरुच राहतील. मध्य आशियात शांतता प्रस्थापित करणं हाच आमचा अंतिम उद्देश आहे.
तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत अमेरिकेवर टीका केलीय. आंतरराष्ट्रीय कायदे आणि मानवी नैतिकतेचं उल्लंघन करणारा हा हल्ला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. इराण आणि रशिया यांचे अनेक वर्षांपासून व्यापारी संबंध राहिलेत. विशेषतः इराणकडून रशियाला होणारा शस्त्रास्त्रांचा पुरवठा हा रशियासाठी कळीचा मुद्दा होता. या पार्श्वभूमीवर पुतीन यांनी आपल्या प्रतिक्रियेतून संताप व्यक्त केलाय. पुतीन म्हणतात,
हे तर मानवी नैतिकतेच उल्लंघन (हेडर) (व्लादिमिर पुतीन, डोनाल्ड ट्रम्प. बॅकग्राऊंडला खामेनी फोटो) खामेनींचा मृत्यू हा विक्षिप्तपणातून झालेल्या हल्ल्याचा परिणाम आहे. मानवी नैतिकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन झालं आहे. एक धोरणी राज्यकर्ते म्हणून खामेनी सदैव ओळखले जातील.
तर चीननंही या हल्ल्याचा निषेध करत आंतरराष्ट्रीय कायद्यांचा मुद्दा उपस्थित केलाय. चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी चिनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे.
चीनकडून हल्ल्याचा निषेध (क्षी जिनपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प. बॅकग्राऊंडला खामेनी) हा हल्ला अमान्य आहे. यामुळं मध्यपूर्व आशियातला तणाव वाढू शकतो. हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाचे मूलभूत निकष ओलांडण्यात आले आहेत. तातडीने युद्धबंदी जाहीर व्हावी, ही चीनची भूमिका आहे.


































