एक्स्प्लोर

BLOG : सीएम विरुद्ध जेएम : वेगळा पॅटर्न... राजकीय सत्तेविरुद्ध लोकशक्तीचा प्रयोग

BLOG : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अनेक निवडणुका गाजल्या. मात्र 2002 साली लातूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी झालेली निवडणूक ही “सत्ता विरुद्ध जनता” या संघर्षाचे दुर्मिळ उदाहरण ठरली. या लढतीला राज्यभर “सीएम विरुद्ध जेएम” अशी ओळख मिळाली.

सर्वशक्तिमान सत्तेला थेट आव्हान

त्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले विलासराव देशमुख हे राज्यातील सर्वात प्रभावी नेते मानले जात होते. प्रशासन, पक्षसंघटना, सत्ता आणि संसाधने सर्व त्यांच्या बाजूने होती. अशा वेळी शिक्षण क्षेत्रातून आलेल्या, कोणत्याही राजकीय घराण्याचा आधार नसलेल्या डॉ. जे. एम. वाघमारे यांनी थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली, हेच मोठे धाडस होते.

कायदा, रणनीती आणि राजकीय गणित

थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा कायदा हा राजकीय फायद्यासाठी करण्यात आला होता. हा प्रयोग सत्ताधाऱ्यांना पूरक ठरेल, असा अंदाज होता. मात्र याच कायद्याने डॉ. वाघमारे यांना थेट जनतेपर्यंत पोहोचण्याची संधी दिली. ही निवडणूक पक्ष विरुद्ध पक्ष अशी न राहता व्यक्तिमत्त्व विरुद्ध सत्ताकेंद्र अशी झाली.

जनतेने हाती घेतलेली निवडणूक

डॉ. वाघमारे यांची उमेदवारी ही कोणत्याही पक्षाची नव्हे, तर लोकांची होती. प्रचार यंत्रणा, पैसा, सत्ता याऐवजी विश्वास, प्रतिमा आणि वैचारिक अधिष्ठान या भांडवलावर ही निवडणूक लढवली गेली. याउलट सत्ताधारी बाजूने प्रतिष्ठा पणाला लावली गेली. नव्या नेतृत्वाचा अति आत्मविश्वास, आदेशात्मक प्रचार आणि लोकभावनेपासून तुटलेपण याचा फटका सत्तेला बसला.

निकालाने दिलेला धक्का

नगराध्यक्षपदावर डॉ. वाघमारे यांचा विजय हा केवळ एका निवडणुकीचा निकाल नव्हता. तो सत्तेला दिलेला स्पष्ट इशारा होता. जनता संघटित झाली, तर मुख्यमंत्रीही पराभूत होऊ शकतो, हा संदेश या निकालाने दिला.

सत्तेचा धडा आणि भविष्यातील खबरदारी...

या पराभवाने विलासराव देशमुख यांनी एक महत्त्वाचा धडा घेतला. 1995 नंतरचा हा दुसरा मोठा धक्का होता. या अनुभवातून पुढील काळात विरोधी शक्ती एकत्र येणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. राजकीय व्यवस्थापन, आघाड्या, अंतर्गत समतोल यामध्ये अधिक चातुर्य आले.

नगराध्यक्षपदाचा कारभार : लोकविश्वासाचा काळ

बहुमत नसतानाही डॉ. वाघमारे यांनी पाच वर्षे नगरपालिकेत लोकांचे विश्वस्त म्हणून काम पाहिले. विकास, सुधारणा आणि पारदर्शकतेचा आग्रह धरला. मात्र स्थानिक राजकारणात सत्तेशी जवळीक साधणाऱ्या घटकांनी या लोकशक्तीच्या प्रयोगाला मर्यादा आणल्या.

2009 : अंतर्गत राजकारणाचा बळी

2009 मध्ये लातूर शहर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जवळपास निश्चित असतानाही, अंतर्गत राजकारणामुळे डॉ. वाघमारे यांना एबी फॉर्म नाकारण्यात आला. ही घटना “उघड लढाईत हरवता न आल्यावर, पडद्यामागे खेळी” कशी केली जाते, याचे उदाहरण ठरली.

जेएम पॅटर्न

सीएम विरुद्ध जेएम ही केवळ व्यक्तींची लढत नव्हती, तो होता सत्तेविरुद्ध समाजबळाचा राजकीय वारसाविरुद्ध वैचारिक उभारीचा आणि व्यवस्थेविरुद्ध लोकशाही हस्तक्षेपाचा प्रयोग. डॉ. जे. एम. वाघमारे यांचा हा राजकीय पॅटर्न आजही दुर्मिळ आहे. सत्ता जिंकली नाही, तरी सत्तेला हादरवण्याची ताकद सामान्य माणसात असते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.

ही बातमी वाचा:

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget