एक्स्प्लोर

'तुम्बाड 2'मध्ये हस्तरला टक्कर देणार 'हा' दमदार अभिनेता; 27 वर्षांपासून गाजवतोय बॉलीवूड 

निर्मात्यांनी सोमवारी मोठी घोषणा करत चित्रपटाच्या कास्टमध्ये एका मोठ्या नावाची भर पडल्याचं स्पष्ट केलं आहे.

Tumbad 2: हॉरर-थ्रिलर तुम्बाड च्या सिक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सोहम शाह स्टारर या चित्रपटाबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. सिनेसृष्टीत तब्बल 27 वर्षे सक्रिय असलेल्या एका दिग्गज अभिनेत्याची या चित्रपटात एंट्री अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.

तुम्बाडसारखा वेगळ्या धाटणीचा चित्रपट बनवणाऱ्या सोहम शाहमुळे तुम्बाड 2 बराच काळ चर्चेत आहे. हॉरर-थ्रिलर चाहत्यांमध्ये या सिक्वेलबाबत प्रचंड उत्सुकता आहे. दरम्यान, निर्मात्यांनी सोमवारी मोठी घोषणा करत चित्रपटाच्या कास्टमध्ये एका मोठ्या नावाची भर पडल्याचं स्पष्ट केलं आहे.

तुम्बाड 2 मध्ये या अभिनेत्याची एंट्री

काही दिवसांपूर्वी या चित्रपटात अक्षय खन्ना आणि श्रद्धा कपूर दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्या केवळ अफवा ठरल्या. आता स्वतः सोहम शाहने एका मोठ्या कलाकाराच्या एंट्रीवर शिक्कामोर्तब केलं असून तो अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी.

गेल्या 27 वर्षांपासून आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारा नवाजुद्दीन सिद्दीकी आता ‘तुम्बाड 2’मध्ये झळकणार आहे. सोहम शाहने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर नवाजसोबतचा फोटो शेअर करत ही माहिती दिली. “तुम्बाड 2 मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी भाईची एंट्री झाली आहे,” असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.अशा चर्चांना उधाण आलं आहे की, चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी भूत ‘हस्तर’ला टक्कर देताना दिसू शकतात. मात्र त्यांच्या भूमिकेबाबत अद्याप अधिकृत तपशील समोर आलेला नाही.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

‘तुम्बाड 2’ कधी रिलीज होणार?

हिंदी चित्रपटसृष्टीतील मोस्ट अवेटेड चित्रपटांच्या यादीत ‘तुम्बाड 2’चा समावेश आहे. पहिल्या भागाने री-रिलीजमध्येही दमदार कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्याच वेळी सिक्वेलची घोषणा करण्यात आली.

रिलीज डेटबाबत बोलायचं झाल्यास, हा चित्रपट 2027 मध्ये मोठ्या पडद्यावर येऊ शकतो, अशी चर्चा आहे. मात्र अधिकृत घोषणा होण्याची प्रेक्षकांना अजून प्रतीक्षा आहे.

काय आहे तुंबाडची गोष्ट?

हॉरर-थ्रिलर तुम्बाडची पार्श्वभूमी असलेली ‘हस्तर’ची पौराणिक कथा आजही अंगावर काटा आणणारी मानली जाते. समृद्धीच्या देवीने विश्वाची निर्मिती करताना प्रथम जन्म दिला तो हस्तरला. मात्र त्याच्या अति लोभामुळे देव-देवतांनी त्याला शाप दिला. त्याचं नाव पुराणांत नसेल आणि त्याची पूजा कधीच होणार नाही. पण 1920 च्या दशकात तुम्बाड गावात एका कुटुंबाने हा निषिद्ध नियम मोडला आणि भयावह परिणामांना सामोरं जावं लागलं.

देवीचा लाडका पण लोभी पुत्र

कथेनुसार, समृद्धीच्या देवीने सृष्टी निर्माण करताना सर्वप्रथम हस्तरला जन्म दिला. त्यानंतर तिच्या पोटी 16 कोटी देव-देवता जन्माला आल्या. हस्तर तिचा आवडता मुलगा होता, पण त्याच्या स्वभावात प्रचंड लोभ होता. देवीने एकदा हस्तरसमोर पर्याय ठेवला.संपूर्ण विश्वातील सोनं घ्यायचं की सर्व अन्न? हस्तरने सोन्याची निवड केली; मात्र लोभ वाढत गेला आणि त्याने अन्नावरही ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे इतर देव-देवतांशी त्याचा संघर्ष उभा राहिला.

महत्त्वाच्या बातम्या

Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
Riteish Deshmukh on Vilasrao Deshmukh: वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
Gaurav More On Johnny Lever: 'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget