एक्स्प्लोर

Gold Rate Today : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण युद्धाचा फटका, सोने- चांदीच्या दरवाढीचा भडका, सोन्याचे दर 7372 रुपयांनी वाढले

Gold Rate Today : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचे परिणाम दिसू लागले आहेत. सोन्याच्या दरात आज मोठी वाढ झाली आहे. 

नवी दिल्ली : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचे परिणाम  सोन्याच्या दरावर झाले आहेत. सोन्याच्या दरात 7372 रुपयांची वाढ झाली आहे. आयबीजेएनं जारी केलेल्या दरांनुसार शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी सोन्याचे दर 7372 रुपयांनी वाढून 166469 रुपयांवर पोहोचले आहेत. 29 जानेवारीला सोन्याच्या दरानं 176121  रुपयांचा उच्चांक गाठला होता. म्हणजेच त्या तुलनेत सध्या सोनं  9652 रुपयांनी स्वस्त आहे. 

Gold Rate Update: सोने महागले

आयबीजेएनं जारी केलेल्या दरांनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 166470 रुपयांवर पोहोचला आहे. तर,22 तोळ्याचा एका ग्रॅमचा दर 162470 रुपयांवर पोहोचला आहे. 20 कॅरेट सोनं 148160 रुपयांवर पोहोचलं असून 18 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 134840 रुपये आहे. तर, 14 कॅरेट सोन्याचा दर देखील 107380 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत. 

बुलियन्स को इन वेबसाईटनं जारी केलेल्या दरांनुसार नवी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या दरात 5850 रुपयांची वाढ होऊन ते 167740 रुपये 10 ग्रॅम जाले. मुंबईत देखील सोन्याच्या दरात 5840 रुपयांची वाढ होत सोनं  168030 रुपये 10 ग्रॅमवर पोहोचलं. कोलकाता शहरात सोन्याचा दर 5830 रुपयांनी वाढून  167810 रुपयांवर पोहोचला. चेन्नईत सोन्याचा दर 5970 रुपयांनी वाढून 168630 रुपये आणि लखनऊमध्ये सोन्याचा दर 4940 रुपयांनी वाढून 168180 रुपये प्रति तोळा झाला आहे. इंदौरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 5850 रुपयांनी वाढून 168210 रुपयांवर पोहोचला आहे. तर, जयपूरमध्ये सोन्याचा दर 5950 रुपयांनी वाढून 168120 रुपये प्रतितोळा झाला आहे. 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर एप्रिल महिन्याच्या वायद्याचे सोन्याचे दर3397 रुपयांनी वाढून 165501 रुपये तोळा झाले आहेत.तर, शुक्रवारी एमसीएक्सवर सोन्याचा दर 162104 रुपये तोळा होता. 

आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डची किंमत 1 टक्क्यांनी वाढून 5329.39 डॉलर प्रति औंस आहे. चांदीच्या दरात देखील आंतरराष्ट्रीय बाजारात 2.8 टक्क्यांची वाढ झाली. चांदीचे दर 96.4 डॉलर प्रति औंस झाली आहे. 

चांदीचे दर 20236 रुपयांनी महागले

अमेरिका आणि इराण  यांच्यातील युद्धामुळं चांदीच्या दरानं देखील उच्चांक गाठला. आयबीजेएनं जारी केलेल्या  दरानुसार 2 मार्चला चांदीचे दर 20236 रुपयांनी वाढले. चांदीचा जीएसटीशिवायचा दर 286936 रुपये किलो होता. जीएसटीसह चांदीचा दर  2 लाख 95 हजार रुपये आहे. 29 जानेवारीला सराफा बाजारात चांदीच्या दरानं 3 लाख 85 हजार 933 रुपयांचा उच्चांक गाठला होता. 

बुलियन्स को इन या वेबसाईटनुसार नवी दिल्लीत चांदीचे दर 15120 रुपयांनी वाढून 296260 रुपये किलो झाला आहे. तर, मुंबईत चांदीचा दर 15140 रुपयांनी वाढून 296770 रुपये किलो झाला.

दरम्यान, जगभरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा गुंतवणूकदार भांडवली बाजारापेक्षा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देत असतात.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Dabur Products Ban : 'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
प्रत्येक महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात आर्थिक साक्षरता अनिवार्य का असावी?
प्रत्येक महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात आर्थिक साक्षरता अनिवार्य का असावी?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget