एक्स्प्लोर

Saudi Arab : इराणवरील हल्ल्यामागचा खरा व्हिलन सौदी अरब, ट्रम्प यांना कॉल करून भडकावल्याचं समोर

US Israel Attack On Iran : सौदी अरबने सार्वजनिकरित्या इराणविषयी संतुलित भूमिका मांडताना, पडद्यामागे मात्र हल्ल्यासाठी लॉबिंग केल्याचं वॉशिग्टन पोस्टच्या अहवालात म्हटलं आहे.

Israel Iran War : इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर आता पश्चिम आशियातील परिस्थिती अधिक चिघळली असून त्याचा जगावरही परिणाम झाल्याचं दिसून येतंय. वरवर हा हल्ला इस्त्रायल आणि अमेरिकेने केला असला तरी त्यामागे खरा व्हिलन हा सौदी अरब हा देश असल्याचं आता स्पष्ट झालंय. सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (MBS) यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना अनेकदा फोन करून इराणविरोधात भडकावल्याचं दावा ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे आता इस्लामिक देशांमध्ये एकच खळबळ उडाल्याचं दिसून येतंय. 

वरवर शांततेची भाषा करणाऱ्या सौदी अरबच्या नेतृत्वाने पडद्यामागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवर कारवाईसाठी प्रवृत्त केल्याचा दावा ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या अहवालात करण्यात आला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या या दाव्यांमुळे पश्चिम आशियातील राजकीय समीकरणं अधिक गुंतागुंतीची बनली आहेत.

मोहम्मद बिन सलमान यांचे ट्रम्प यांना खासगी फोन? (MBS Private Calls Claim)

‘वॉशिंग्टन पोस्ट’ने चार सूत्रांचा हवाला देत दावा केला आहे की सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (MBS) यांनी गेल्या महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांना अनेकदा खासगी फोन केले. या संवादात त्यांनी इराणवर लष्करी कारवाई करण्यासाठी वारंवार आग्रह धरल्याचे वृत्त आहे. या अहवालानुसार, ट्रम्प सुरुवातीला कूटनीतिक मार्गाने तोडगा काढण्याच्या विचारात होते. मात्र सलमान सातत्याने हल्ल्याच्या भूमिकेवर ठाम होते.

सौदीचा डबल गेम (Saudi Double Stand Allegation)

इराणविरोधात आधीपासूनच दबाव टाकणाऱ्या इस्त्रायलप्रमाणेच सौदी अरेबियानेही अमेरिकेवर दबाव आणल्याचा दावा आहे. सार्वजनिकरित्या इराणविषयी संतुलित भूमिका मांडताना, पडद्यामागे मात्र हल्ल्यासाठी लॉबिंग करण्यात आल्याचे या अहवालात म्हटले आहे.

मोहम्मद बिन सलमान यांनी ट्रम्प यांना असा विश्वास दिला की इराणला रोखण्यासाठी लष्करी कारवाई हाच एकमेव पर्याय आहे. तसंच, जर अमेरिकेने हल्ला केला नाही तर इराण अधिक शक्तिशाली होईल, असा इशाराही दिल्याचं वृत्त आहे. प्रत्युत्तरात इराणने हल्ला केल्यास सौदी अरेबिया तेलपुरवठा आणि प्रादेशिक सुरक्षेची जबाबदारी सांभाळेल, असं आश्वासनही दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

कुशनर-सलमान संबंधांचा वापर? (Kushner–MBS Equation)

डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांच्याशी असलेल्या जवळच्या संबंधांचा वापर करून सौदी प्रिन्स यांनी व्हाइट हाऊसमध्ये आपली बाजू मजबूत केली, असेही अहवालात नमूद आहे. 

दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मध्यस्थीमुळे इराण-सौदी अरबमधील संबंधांमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली होती. तरीही, पडद्यामागे वेगळी भूमिका घेतल्याचा आरोप या वृत्तातून समोर आला आहे. या सर्व दाव्यांवर सौदी अरब किंवा अमेरिकेकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसून, पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Embed widget