एक्स्प्लोर
Prajakta Gaikwad | सहकलाकाराने शिवीगाळ केल्यानेच मालिका सोडली, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा आरोप
'आई माझी काळूबाई' ही मालिका सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. . पण सोमवारी (2 नोव्हेंबर) ही मालिका पुन्हा चर्चेत आली ती या मालिकेतली आर्या फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या एक्झिटच्या बातमीमुळे. तिच्या जागी आता अभिनेत्री वीणा जगताप ही भूमिका साकारणार आहे. प्राजक्ताने अचानक ही मालिका सोडण्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत असतानाच या मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनीही प्राजक्ताबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला. आता त्यावर प्राजक्ताने आपली बाजू मांडत स्पष्टीकरण दिलं आहे. 'काळूबाई'च्या सेटवर आपल्याला शिवीगाळ झाल्यानेच आपण ही मालिका सोडली असं तिने सांगितलं आहे.
आणखी पाहा


















