एक्स्प्लोर
Deepika Padukone drugs chat | ड्रग्जसंदर्भात चॅट केलं, पण ड्रग्ज घेतलं नाही : दीपिका पदुकोण
ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून अभिनेत्री दीपिका पादुकोणची चौकशी सुरु आहे. एनसीबीकडून समन्स आल्यानंतर आज दीपिका पादुकोण निर्धारित वेळेआधी दहा मिनिटं एनसीबी कार्यालयात पोहोचली. गेल्या दोन तासांपासून तिची चौकशी सुरु आहे. दीपिकानं ड्रग्ज चॅटसंदर्भात कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र आपण ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं तिनं सांगितलं असल्याचीही माहिती आहे. दीपिकाकडून काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याची देखील माहिती आहे. गेल्या तीन तासांहून अधिक काळापासून दीपिकाची चौकशी सुरु आहे.
आणखी पाहा























