Pathaan Movie Release : शाहरुख खानचा बहुचर्चित सिनेमा पठान प्रदर्शित, प्रेक्षकांचं म्हणणं काय?
अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित सिनेमा पठान आज रीलीज झालाय. गेल्या काही दिवसांत पठान सिनेमावरून मोठा वांदंग सुरूय. आधी बेशरम रंग या गाण्यातील भगव्या रंगाची बिकिनी आणि गाण्याचे बोल यावर आक्षेप नोंदवला गेला होता. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने काही बदल सुचवले होते. आज हा सिनेमा रीलीज झालाय. अमरावती आणि सांगलीत शाहरुख खानच्या फॅन क्लबने संपूर्ण थिएटर बूक केलंय, मात्र सांगलीत पठान सिनेमा प्रदर्शित करण्याला बजरंग दलाने विरोध केलाय. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मिरज आणि सांगलीतील थिएटर मालकांची भेट घेऊन पठान सिनेमा रीलीज न करण्याचं आवाहन केलंय. तर मुंबईत बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं सिनेमाला विरोध करत पोलिसांना निवेदन दिलंय. बेळगावातही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाठान सिनेमाचं पोस्टर काढण्याचा प्रयत्न केलाय.






















