एक्स्प्लोर

Lok Sabha Result 2024 : कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर? पाहा मतांचा कौल कुणाला? किती?

Lok Sabha Result 2024 : कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर? पाहा मतांचा कौल कुणाला? किती?

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha  Election Counitng) मतमोजणीची प्रक्रिया सर्वत्र सुरु आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या (Maharashtra Lok Sabha Seat) 48 जागा आहेत. या जागांवर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (MVA) कांटे की टक्कर आहे. पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या 10 जागा आहेत. या जागांवर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सकाळी 10 वाजेपर्यंतच्या मतमोजणीतील कलानुसार महाविकास आघाडी पश्चिम महाराष्ट्रात आघाडीवर आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) आघाडीवर आहेत. कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपती महाराज (Shahu Maharaj) आघाडीवर आहेत. शिरुरमध्ये अमोल कोल्हे (Amol Kolhe) आघाडीवर आहेत तर  पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत. 

कोल्हापूरमध्ये कोण आघाडीवर? 

कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या शाहू छत्रपती यांनी शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्यावर आघाडी मिळवली आहे. पहिल्या फेरीपासून शाहू महाराज छत्रपती यांनी आघाडी मिळवलेली आहे. 

सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर आहेत. विशाल पाटील यांनी भाजपच्या संजयकाका पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांना पिछाडीवर टाकलं आहे. सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील 30 हजार मतांनी आघाडीवर आहे. 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजीत पाटील आघाडीवर आहेत. ठाकरेंच्या उमेदवारानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्यावर आघाडी मिळवली आहे. तर, राजू शेट्टी देखील या लोकसभा  मतदारसंघात पिछाडीवर आहेत. 

साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे शशिकांत शिंदे तिसऱ्या फेरीअखेर आघाडीवर होते. भाजपचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले पिछाडीवर होते. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या देखील आघाडीवर आहेत. इथं देखील राम सातपुते यांच्यावर प्रणिती शिंदे यांनी आघाडी मिळवली आहे.

माढा लोकसभा निवडणुकीची लढत सर्वत्र चर्चेत होती. इथं भाजपचे रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पार्टीचे धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत. ही जागा कोण मिळवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर आघाडी घेतलेली आहे. सुप्रिया सुळे यांची आघाडी कमी झाली असून सुनेत्रा पवार या देखील त्यांना कडवी लढत देत आहेत. 
 
पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर पिछाडीवर आहेत.

शिरुर लोकसभा मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीराव आढळराव यांच्यावर आघाडी घेतली आहे. 

मावळ लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे आघाडीवर आहेत. मावळमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांच्यावर आघाडी मिळवली आहे. 

निवडणूक व्हिडीओ

Congress on Vidhan Sabha : निवडणुकीच्या तयारीत काँग्रेसची आघाडी,1ॲाक्टोबरपासून इच्छुकांच्या मुलाखती
Congress on Vidhan Sabha : निवडणुकीच्या तयारीत काँग्रेसची आघाडी,1ॲाक्टोबरपासून इच्छुकांच्या मुलाखती

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Mumbai Crime News : क्षुल्लक कारणावरुन वादाची ठिणगी, 80 वर्षीय बापानं लेकाला संपवलं, दादरमध्ये धक्कादायक प्रकार
क्षुल्लक कारणावरुन वाद, बापानं लेकाला संपवलं, मुंबईतील दादरमध्ये खळबळजनक घटना
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

MVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीकाDevendra Fadnavis : धुळे लोकसभेत फक्त मालेगाव मध्यमुळे महायुतीचा उमेदवार गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Mumbai Crime News : क्षुल्लक कारणावरुन वादाची ठिणगी, 80 वर्षीय बापानं लेकाला संपवलं, दादरमध्ये धक्कादायक प्रकार
क्षुल्लक कारणावरुन वाद, बापानं लेकाला संपवलं, मुंबईतील दादरमध्ये खळबळजनक घटना
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
October Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
Embed widget