Vidhansabha election 2024 मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा
Vidhansabha 2024 मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या 2 दिवसांत राज्यातील राजकीय पक्ष व विविध संस्थांशी चर्चा करुन विधानसभा निवडणुकांसाठीचा (Election 2024) आढावा घेतला आहे. त्यानंतर, आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठीची महत्वाची माहिती दिली. राज्यातील मतदारांची संख्या, पुरुष, महिला, तृतीयपंथी मतदार आणि मतदारांमध्ये झालेल्या वाढीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी माहिती दिली. तसेच, निवडणूक काळात काही निर्बंध घालण्यात येणार असून एटीएमसाठी (ATM) पैशांचा पुरवठा करणाऱ्या व्हॅनला वेळेचे बंधन असणार आहे. तसेच, याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावर देखील लक्ष ठेवलं जाईल, असेही राजीव कुमार यांनी म्हटलं.
राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. त्यासाठी, राज्यात पुरुष मतदार 4. 95 कोटी आणि स्त्री मतदार 4.64 कोटी आहेत, थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 असून राज्यातील दिव्यांग मतदार 6.32 लाख एवढे आहेत. यंदा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवयुवकांची संख्या म्हणजे नव मतदार 19.48 लाख एवढे आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून 10.77 लाख मतदार आहेत.