एक्स्प्लोर
Vidhansabha election 2024 मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
Vidhansabha election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या 2 दिवसांत राज्यातील राजकीय पक्ष व विविध संस्थांशी चर्चा करुन विधानसभा निवडणुकांसाठीचा (Election 2024) आढावा घेतला आहे.
election commission on vidhansabha voting paid holiday
1/8

केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या 2 दिवसांत राज्यातील राजकीय पक्ष व विविध संस्थांशी चर्चा करुन विधानसभा निवडणुकांसाठीचा (Election 2024) आढावा घेतला आहे. त्यानंतर, आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठीची महत्वाची माहिती दिली.
2/8

राज्यातील मतदारांची संख्या, पुरुष, महिला, तृतीयपंथी मतदार आणि मतदारांमध्ये झालेल्या वाढीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी माहिती दिली. यावेळी, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना निवडणूक मतदानाचा दिवस हा पगारी सुट्टी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
3/8

मतदानाच्या दिवशी आपल्या कामाचे खाडे लागले जाईल, आपला दिवसाचा रोजगार कपात होईल म्हणून गरिब वस्तीत किंवा रोजंदारी व इंडस्ट्रीजमध्ये कामाला जाणारे कामगार मतदानाला येत नाहीत.
4/8

कामगार वर्गाने मतदानाला यावे, मतदानाला भरभरुन प्रतिसाद द्यावा, त्यासाठी मतदानाच्या दिवसी भरपगारी सुट्टी देण्यात येत असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
5/8

यासंदर्भात प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली असून निवडणूक मतदानाचा दिवस हा पगारी सुट्टीचा दिवस असेल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.
6/8

त्यामुळे, इंडस्ट्रीजमधील कामगार किंवा असंघटीत कामगाार क्षेत्रातील मतदारांनी पगार कापला जाईल, अशी भीती न बाळगता मतदानासाठी बाहेर यावे, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
7/8

तसेच, ज्या संस्था सुट्टी देणार नाहीत, त्या संस्थावर कारवाईचे थेट आदेश राहतील,असेही आयोगाने सांगितले.
8/8

दरम्यान, निवडणूक काळात काही निर्बंध घालण्यात येणार असून एटीएमसाठी (ATM) पैशांचा पुरवठा करणाऱ्या व्हॅनला वेळेचे बंधन असणार आहे. तसेच, याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावर देखील लक्ष ठेवलं जाईल, असेही राजीव कुमार यांनी म्हटलं.
Published at : 28 Sep 2024 05:28 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
मुंबई
महाराष्ट्र
कोल्हापूर


















