एक्स्प्लोर
Photos: मातोश्रीवर जल्लोष... ठाकरे बंधुंचा गुलाल, आईला कडकडून मिठी; बापाच्या चेहऱ्यावरही हसू
मुंबई विद्यापीठात दोन वर्षांच्या विलंबानंतर झालेल्या निवडणुकीत 10 पैकी 10 जागांवर युवासेनेने विजय मिळवला आहे. या विजयानंतर रात्री मुंबई विद्यापीठाबाहेर ठाकरे गटाकडून एकच जल्लोष करण्यात आला.

Aditya Thackeray jallosh in matoshree
1/9

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेने (Yuvasena) पुन्हा एकदा वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.
2/9

मुंबई विद्यापीठात दोन वर्षांच्या विलंबानंतर झालेल्या निवडणुकीत 10 पैकी 10 जागांवर युवासेनेने विजय मिळवला आहे. या विजयानंतर रात्री मुंबई विद्यापीठाबाहेर ठाकरे गटाकडून एकच जल्लोष करण्यात आला.
3/9

आदित्य ठाकरेंच्या युवासेनेने दहाच्या दहा दहा जिंकून भाजप प्रणित आखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे ABVP चा धुव्वा उडवला आहे. युवासेनेने ज्याप्रकारे पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.
4/9

युवासेनेकडून आज मातोश्री बंगल्याबाहेर दुपारी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. सर्व विजयी उमेदवारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंची भेट घेतली.
5/9

मातोश्रीवर बऱ्याच दिवसांनी गुलालाची उधळण करण्यात आली. त्यावेळी, संपूर्ण ठाकरे कुटुंब या विजयी आनंदात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.
6/9

विशेष म्हणजे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंनी एकमेकांना कडकडून मिठी मारल्याचं पाहायला मिळालं. तर, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना दोन्ही ठाकरे बंधुंना खांद्यावर घेऊन आनंद साजरा केला
7/9

आदित्य ठाकरेंनी आई रश्मी ठाकरेंना कडकडून मिठी मारली, तसेच आईच्या गालावर लेकानं गुलालही लावला. यावेळी, मातोश्रीच्या गॅलरीत उभारलेल्या उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावही हसू उमटले होते.
8/9

ठाकरे कुटुंबीयांसाठी अतिशय़ भावनिक आणि आनंदाचा हा क्षण होता. कारण, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य व तेजस हे दोघेही विजयी जल्लोष साजरा करत होते.
9/9

आदित्य ठाकरेंचा उत्साह पाहून आई रश्मी ठाकरेंच्या चेहऱ्यावरही आनंदाचे क्षण दिसून आले. मातोश्रीबाहेर युवासेना व शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केल्याचं दिसून आलं.
Published at : 28 Sep 2024 02:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
ठाणे
हिंगोली
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion