Sharad Pawar on Maharashtra Vidhan Sabha : 15-20 नोव्हेंबरला मतदानाची शक्यता, पवारांचा अंदाज
6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान निवडणुकांची घोषणा आणि तर 15 ते 20 नोव्हेंबर च्या दरम्यान मतदान होईल, शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज.
महाराष्ट्र मध्ये वेगळं वातावरण आहे
लोकसभेळक वेगळं चित्र आहे
प्रधानमंत्री सांगत होते 400 च्या वर जागा येतील
पाच वर्षपूर्वी जी निवडणूक झाली त्यात राष्ट्रवादी चार आणि काँग्रेस चा एक आला
राष्ट्रवादी ने 10 जहा लढल्या त्यातील 8 आल्या
लोकांचे मत कार्यकर्त्यांशी मताशी संबंधित होते म्हणून आपल्याला यश मिळाले
नेते आणि नागरिक यांचे मत वेगळे होते
बारामतीत अनेक नेत्यांनी भाषणं केली आम्ही जागा जिंकणार असे सांगत होते
पण लोकांनी आणि तुम्ही ठवरले हॊते
1 लाख 58 हजार मतांनी तुम्ही आपली जागा निवडून आणली
काही लोक अशी असतात की आभाळकडे बघून पाऊस पडेल का नाही. पण आता कळायला लागले की पाऊस पडेल
त्यामुळे गर्दी वाढली आहे
कुठंही गेलो तरी हजरोच्या संख्येने लोकं भेटतात
लोकांच्यात खात्री झाली की या निवडणुकीत काही झालं तरी जिंकायचं
चांगले निकाल लागतील यात शंका नाही
ही निवडणूक 3 लोकं एकत्र येऊन लढणार आहेत
संजय राऊत, नाना पटोले, जयंत पाटील यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे
प्रत्येक तालुक्यात सर्व्हे केला जाणार आहे
इच्छुक उमेदवाराला विचारायचे नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला काय वाटत विचारले जाईल आणि मग निर्णय घेतला जाईल
पुढच्या 8 ते 10 दिवसात हे काम संपले पाहिजे
निवडणूक आयोग तारीख ठरवेल
माझा अंदाज आहे की 6 ते 10 च्या दरम्यान तारखा जाहीर करतील
15 ते 20 नोव्हेंबर च्या दरम्यान मतदान होईल असा अंदाज आहे
पुढच्या काही दिवसात जागेचा निर्णय होईल
आपल्या जिल्ह्यात उमेदवारांची संख्या फार आहे
त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अस्वस्थता निर्माण झाली आहे..आणि लोकांच्यात चर्चा सुरू झाली आहे
दबक्या आवाजात चर्चा आहे ती इंदापूर मध्ये आहे याची त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थता आहे
सगळ्यांना विचारून निर्णय घेतला जाईल
निवडून येण्याची क्षमता बघितली जाईल
इंदापूर मध्ये बदल घडेल असे वातावरण आहे
काही जागा काँग्रेस आणि सेनेला द्याव्या लागतील
आघाडी आहे म्हटल्यावर सगळ्या जागा घेऊन चालत नाही काही जागा सोडव्या लागतील
जागा सोडून चालणार नाही त्यांचे कामही करावे लागेल
तुम्ही निवडणुकीत कष्ट केले त्यामुळे तुम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे
आमदार राष्ट्रवादीचा हा निकाल घेऊन तुम्ही कामाला लागा