October Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
Monthly Horoscope October 2024 : ऑक्टोबर महिना अनेक राशींच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल, काहींसाठी हा काळ खडतर असेल. ऑक्टोबरमधील 31 दिवस तुमच्यासाठी नेमके कसे राहतील? जाणून घ्या
October 2024 Monthly Horoscope : ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. ऑक्टोबरमध्ये ग्रह-ताऱ्यांची स्थिती अतिशय विशेष मानली जाते. ज्योतिषीय गणनेनुसार, ऑक्टोबरमध्ये सूर्य, शुक्र आणि बुध या प्रमुख ग्रहांच्या राशीत बदल होणार असून, त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येईल. अशात मेष ते मीन, सर्व 12 राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? जाणून घ्या
मेष (Aries Monthly Horoscope October 2024)
मेष राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगला असेल. या महिन्यात तुम्हाला शारीरिकदृष्ट्या खूप निरोगी वाटेल. आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी स्थिती मध्यम राहील. महिन्याच्या मध्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी अडथळ्यांना सामोरं जावं लागू शकतं. सप्टेंबर महिन्यात भागीदारीत कोणतंही नवीन काम करू नये. या महिन्यात तुम्ही कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नये. अविवाहित लोकांचं लग्न या महिन्यात ठरण्याची शक्यता आहे. तुमचं वैवाहिक जीवन सामान्य राहील.
वृषभ (Taurus Monthly Horoscope October 2024)
वृषभ राशीच्या लोकांना ऑक्टोबरमध्ये रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. या काळात वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या आवडीची नोकरीही मिळू शकते. जर तुम्ही बऱ्याच काळापासून चांगल्या नोकरीच्या शोधत असाल तर ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी विशेष लाभ घेऊन येणार आहे. चांगल्या पगाराची नोकरी मिळाल्याने तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. या महिन्यात तुम्ही तुमची बरीच अपूर्ण कामं पूर्ण करू शकाल. व्यावसायिकांबद्दल बोलायचं झालं तर, ऑक्टोबरमध्ये नवीन व्यावसायिकांचा व्यवसायही मजबूत होईल. यामुळे त्यांच्या जीवनात आनंद येईल.
मिथुन (Gemini Monthly Horoscope October 2024)
मिथुन राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना खूप शुभ ठरणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना या काळात विशेष यश मिळेल आणि त्यांना कामाच्या ठिकाणी अशा संधी मिळतील, ज्यामुळे ते प्रगतीच्या मार्गावर पुढे जातील. यासोबतच तुमचा मान-सन्मानही वाढेल. मिथुन राशीच्या लोकांच्या लव्ह लाईफसाठी ऑक्टोबरचा काळ चांगला राहील. तुमच्या जोडीदारासोबतचं तुमचं नातं अधिक घट्ट होईल. या महिन्यात तुम्ही अपूर्ण कामं सहज पूर्ण करू शकाल.
कर्क (Cancer Monthly Horoscope October 2024)
ऑक्टोबर महिन्यात कर्क राशीच्या लोकांना व्यवसायाशी संबंधित अनेक चांगल्या डील मिळतील, ज्यातून त्यांना चांगला नफा मिळेल. दुसरीकडे, जर आपण कौटुंबिक जीवनाबद्दल बोललो तर, तुम्ही सगळ्यांशी मिळून मिसळून राहाल. तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण जाणवणार नाही. तुम्ही करिअरवर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकाल. कर्क राशीच्या लोकांचा विश्वास या काळात वाढलेला दिसेल.
सिंह (Leo Monthly Horoscope October 2024)
ऑक्टोबर महिना सिंह राशीसाठी खूप शुभ राहील. हा महिना सिंह राशीच्या लोकांना अपेक्षित परिणाम देईल. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचं आणि मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. या काळात तुम्हाला मोठं यश मिळणार आहे. तुमची अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली सर्व कामं ऑक्टोबरमध्ये पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमची कोर्टाशी संबंधित काही प्रलंबित प्रकरणं असतील तर आज त्याचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. या महिन्यात तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदारासोबत तुम्ही आनंददायी क्षण घालवाल.
कन्या (Virgo Monthly Horoscope October 2024)
कन्या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना खूप शुभ राहील. या काळात कन्या राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कन्या राशीच्या लोकांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावेत. तुम्ही मेहनत केली तर तुमच्या मेहनतीला नक्कीच फळ मिळेल. त्याचबरोबर नोकरदार लोकांच्या पगारातही वाढ होऊ शकते. या महिन्यात तुमची तुमच्या जोडीदारासोबतची जवळीक वाढेल. तुमचा जोडीदार तुमच्या सुख-दु:खात तुमची साथ देईल.
तूळ (Libra Monthly Horoscope October 2024)
तूळ राशीच्या लोकांसाठी हा ऑक्टोबर महिना जबाबदाऱ्यांचा असेल. तुम्हाला कामावर आणि घरात महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होणार असल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. त्याचबरोबर कुटुंबाच्या पाठिंब्याने तुमचं मन प्रसन्न राहील. या काळात तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. उत्पन्नाच्या अतिरिक्त स्रोतांमधूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायाशी संबंधित लोकांना लाभ होईल.
वृश्चिक (Scorpio Monthly Horoscope October 2024)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी महिना मध्यम फलदायी असेल. या महिन्यात तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थोडे अस्वस्थ होऊ शकता. तर आर्थिक बाजूने काळ अनुकूल राहील. तुमचं प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतं. कौटुंबिक सुख-समृद्धी मध्यम राहील. वैवाहिक जीवनात सामंजस्य नसल्यामुळे थोडा तणाव राहील. प्रेमसंबंधात बदल होतील. नोकरदार वर्गासाठी महिना शुभ आहे. भागीदारांसोबत व्यवसायात काही अडचणी येतील. मुलांच्या बाजूने काही समस्या उद्भवू शकतात, त्या महिन्याच्या अखेरीस दूर होतील. यावर उपाय म्हणून सूर्याला जल अर्पण करा.
धनु (Sagittarius Monthly Horoscope October 2024)
धनु राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना फायदेशीर आहे. या महिन्यात शुभ कार्यात सहभागी होऊन तुम्हाला आनंद वाटेल. व्यावसायिकांचा नफा वाढेल. प्रवासातही तुम्हाला फायदा होईल. नोकरदार लोकांनाही त्यांच्या सुरू केलेल्या कामात यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्हाला अनावश्यक वाद टाळण्याचा सल्ला दिला जातो.
मकर (Capricorn Monthly Horoscope October 2024)
मकर राशीच्या लोकांसाठी महिना खूप चांगला आहेृ, परंतु या महिन्यात महत्त्वाचे निर्णय घेणं टाळावं. या महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी आनंददायी असेल. पण, तुमचा स्वभाव रागीट होऊ शकतो. तुमची चिडचिड होऊ शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. हा महिना आरोग्याच्या दृष्टीकोनातून शुभ आहे आणि आर्थिक दृष्टीकोनातून वेळ मध्यम आहे, जोखमीची गुंतवणूक टाळा, अन्यथा नुकसान सहन करावं लागेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्हाला मित्रांसोबत फिरायला जाता येईल.
कुंभ (Aquarius Monthly Horoscope October 2024)
कुंभ राशीच्या लोकांनी ऑक्टोबर महिन्यात जे काही महत्त्वाचं काम कराल, त्यामध्ये त्यांच्या जोडीदाराचा सल्ला घ्यावा. या महिन्यात तुमची कामगिरी चांगली असेल, ज्यामुळे तुम्हाला लाभ मिळतील. प्रेमप्रकरणात वाद होतील नवीन प्रेमसंबंधही निर्माण होऊ शकतात. नोकरदार लोकांना कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. या महिन्यात तुम्ही जे काही नवीन काम सुरू कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखी होईल.
मीन (Pisces Monthly Horoscope October 2024)
मीन राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना खूप चांगला जाईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल राहील. हा महिना तुमच्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगला असणार आहे. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील. विद्यार्थ्यांसाठीही काळ चांगला जाणार आहे. नोकरीत असलेल्यांना प्रलंबित कामात प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला सहकाऱ्यांचं सहकार्य मिळेल आणि नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. घरात धार्मिक कार्य निघण्याची शक्यता आहे. चांगल्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा :