Zero Hour : Sangli Corporation:महापालिकेचे महामुद्दे :शेरीनाल्याच्या शुद्धीकरणाचा प्रश्न कधी सुटणार?
देशात नद्या जोड प्रकल्प राबवण्यात येत असताना, सांगली महापालिका मात्र शेरीनाला आणि कृष्णा नदी जोड प्रकल्प राबवत असल्याचं उपरोधानं म्हटलं जातं. कारण सांगली महापालिकेनं नाला आणि नदी जोडली आहे. सांगलीतल्या शेरीनाल्यामधून दररोज हजारो लीटर सांडपाणी कृष्णा नदीत सोडलं जातं. खेदाची बाब ही आहे की, गेल्या कित्येक वर्षांपासून शेरीनाल्याचा प्रश्न सांगली महापालिकेला आणि इथल्या नेतृत्वाला सोडवता आलेला नाही. इतकंच नाही तर कृष्णा नदीत होत असलेल्या या प्रदूषणापोटी सांगली महापालिका प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दंडही भरतेय. पाहूयात एबीपी माझाच विशेष रिपोर्ट.
सांगली महापालिकेनं तब्बल ४० कोटी रुपये खर्च करून शेरीनाला शुद्धीकरण योजना राबवली खरी, पण ही योजना अजूनही पूर्ण क्षमतेनं सुरू झालेली नाही...
त्यामुळं सांगली शहरातलं लाखो लिटर सांडपाणी हे शेरीनाल्यातून सरकारी घाटापासून पुढे थेट कृष्णा नदीच्या पात्रात मिसळतं...
सांगली महापालिका क्षेत्रातला हा सर्वात गंभीर प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे...
त्यामुळं कृष्णा नदीचं प्रदूषण सुरुचय...
हे दुष्टचक्र थांबणार तरी कधी? असा प्रश्न आता सांगलीकर विचारतायत...
कूपवाडच्या सावळी हद्दीपासून वाहणाऱ्या शेरीनाल्यातून दररोज शेकडो लीटर सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळत होतं...
त्यामुळं राष्ट्रीय नदी कृती योजनेअंतर्गत शेरीनाला शुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला होता...
कृष्णाकाठावर शेरीनाला अडवून पंपिंगद्वारे ते सांडपाणी धुळगावपर्यंत नेणं आणि तिथं ऑक्सिडेशन पॉण्डमध्ये ते शुद्ध करून शेतीला पाणी देण्याची ही योजना होती...
शेरीनाल्यावरील पंपगृह... कवलापूर येथील पंपगृह... धुळगावपर्यंतची १८ किलोमीटरची वाहिनी... धुळगाव येथे ऑक्सिडेशन पॉण्ड ही कामं पूर्ण झालीयत...
तरीही कृष्णा नदीचं प्रदूषण थांबलेले नाही...
शेरीनाल्यावर पंप बंद असतात, अथवा, अथवा त्यात बिघाड झालेला असतो...
त्यामुळं शेरीनाल्यातलं सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळतं
आता शेरीनाल्यावर शुद्धीकरण यंत्रणा उभारून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे...
कृष्णा नदीच्या प्रदुषणाला कारणीभूत ठरणारा शेरीनाल्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी सांगली महापालिका ९४ कोटींचा प्रकल्प हाती घेणाराय...
या प्रकल्पातून जलशुध्दीकरणानं उपलब्ध होणारं पाणी शेतीसाठी देण्याची योजना आहे...
All Shows

































