एक्स्प्लोर

WhatsApp New Feature : व्हॉट्सॲपचं नवीन भन्नाट फिचर! लॉगिन करणं आणखी सोपं, युजर्सला होणार मोठा फायदा

WhatsApp Email Support : व्हॉट्सॲप युजर्ससाठी आता ईमेल लॉगिन फिचर (WhatsApp Email Login) येणार आहे. यामुळे व्हॉट्सॲपचा वापर आणखी सोपा होणार आहे.

WhatsApp Email Support Feature : अलिकडच्या काळात सोशल मीडिया विशेषत: व्हॉट्सॲपचा (WhatsApp) वापर वाढला आहे. व्हॉट्सॲप वैयक्तिक आयुष्यासह कामाच्या बाबतीतही खूप फायदेशीर ठरताना दिसत आहे. आता व्हॉट्सॲप वापरणं आणखी सोपं होणार आहे. कंपनी युजर्ससाठी नवीन फिचर (WhatsApp New Feature) आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे इंस्टंट मेसेंजिग ॲपचा (Instant Messenging App) वापर आणखी सुकर होणार आहे. व्हॉट्सॲप (WhatsApp) लॉगिनसाठी (Log In) ईमेलचा (Email) वापर करण्यासाठी फिचर (Feature) बनवत आहे.

व्हॉट्सॲप युजर्ससाठी नवीन फिचर

WABetaInfo कडून मिळालेल्या माहितीनुसार, मेटा कंपनीच्या मालकीच्या व्हॉट्सॲपने आपल्या युजर्ससाठी त्यांच्या अकाऊंटवर लॉगिन करण्याचा आणखी एक पद्धत उपलब्ध केली आहे. या नवीन पद्धतीमध्ये युजर्सना ईमेलच्या मदतीने त्यांच्या अकाऊंटमध्ये लॉगिन करू शकतात. सध्या हे फिचर फक्त आयफोन युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आलं असून लवकरच हे इतर अँड्रॉइट युजर्ससाठीही उपलब्ध करण्यात येईल. 

ईमेल लॉगिन फिचर

WB च्या अहवालानुसार, आयफोन युजर्सला SMS द्वारे लॉगिन करण्यात कोणतीही समस्या येत असेल तर ईमेलद्वारे लॉगिन करता येईल. जर आयफोन युजर्सला मेसेज (SMS) द्वारे 6 अंकी कोड ओटीपी मिळवण्यात कोणतीही अडचण येत असेल तर युजर्स ईमेलद्वारे कोड मिळवून त्यांच्या अकाऊंटवर लॉगिन करू शकतात. WABetaInfo च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, व्हॉट्सॲपने ॲप स्टोअरमध्ये 23.24.70 रिलीझ केलं आहे. 

व्हॉट्सॲपने अद्याप या नवीन फीचरबाबत सविस्तर अधिकृत माहिती दिलेली नाही. पण हे फीचर आयओएस युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. हे फीचर तपासण्यासाठी युजर्सना सेटिंग्जमध्ये जावं लागेल, त्यानंतर अकाउंट्समध्ये जावं लागेल. दरम्यान, ईमेल लॉगिन फिचर तात्पुरतं आहे. युजर्सना SMS वर ओटीपी मिळवण्यात समस्या येत असल्याच्या तक्रारी मिळाल्याने कंपनीने ही तात्पुरती सुविधा उपलब्ध केल्याचं सांगितलं जात आहे.

व्हॉट्सॲप वेळोवेळी अपडेट

जर तुम्ही आयफोन युजर असाल आणि तुम्हाला अजूनही व्हॉट्सॲपमध्ये हे फिचर उपबल्ध झालं नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. पुढील एक किंवा दोन आठवड्यांत तुम्हाला देखील हे फिचर मिळेल. पण तुम्हाला व्हॉट्सॲप वेळोवेळी अपडेट करावं लागेल.

व्हॉट्सॲप स्टेटससाठी नवीन अपडेट

याशिवाय, WABetaInfo च्या पोस्टवरून मिळालेल्या माहितीनुसार, बीटा 2.23.25.3 अपडेटमध्ये स्टेटससाठी नवीन अपडेट देखील लाँच करण्यात आलं आहे. व्हॉट्सॲपमध्ये स्टेटससाठी फिल्टर देण्यात आलं आहे. ॲपमध्ये फिल्टर दिसल्यानंतर, तुम्हाला चार विभागांमध्ये विभागलेले स्टेटस दिसतील. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Tecno Spark 20C : iPhone सारखा रॉयल लूक! 50MP कॅमेरा आणि 16GB रॅमसह दमदार फोन लाँच

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 : ABP MajhaTOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP MajhaRahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Embed widget