Nothing 2 : Nothing 2 फर्स्ट लुक आला समोर, या दमदार फिचर्ससह मिळणार आता नथिंग 2
तुम्ही जर फोनचे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नुकताच Nothing 2 चा फर्स्ट लुक समोर आला आहे. गेल्याच वर्षी Nothing 2 कंपनीकडून लाँच करण्यात आला होता.
Nothing Phone 2 First Look : तुम्ही जर फोनचे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नुकताच Nothing 2 चा फर्स्ट लुक समोर आला आहे. गेल्याच वर्षी Nothing 2 कंपनीकडून लॉन्च करण्यात आला होता. आता येत्या 11 जुलैला Nothing 2 कंपनी हा फोन लॉन्च करणार आहे. जाणून घ्या फोनची किंमत, फिचर्स आणि लुक.
कसा असेल Nothing 2 चा लुक
कंपनीने Nothing 1 प्रमाणेच Nothing 2 चे डिझाईन ठेवलेले आहे. यात काही फारसा बदल करण्यात आलेला नाही. गेल्या वर्षीप्रमाणेच या फोनमध्येही पांढरा आणि राखाडी असे दोन रंग ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत. तर आता यामध्ये आपल्याला नवीन Glyph इंटरफेस बघायला मिळेल. कंपनी यावेळी प्रिमियम स्पेसिफिकेशनसह हा फोन लाँच करेल.
Come to the bright side.
— Nothing (@nothing) June 13, 2023
Meet Phone (2) on 11 July, 16:00 BST.
Join us for the official launch on https://t.co/pLWW07l8G7 pic.twitter.com/WoSw0gLJOx
Nothing 2 फिचर्स (Features Of Nothing 2)
आगामी फोनमध्ये 33 LED लाईट्स असतील , जे आधीच्या फोनपेक्षा खूप जास्त आहे. Nothing 1 मध्ये कंपनीने 12 LED लाईट्स दिले होते. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह येईल. त्यात 4700mAh बॅटरी मिळेल. तर या फोनला 12GB पर्यंत रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजचा सपोर्ट मिळू शकतो. UFS 4.0 स्टोरेज सोल्यूशन फोनमध्ये मिळू शकत नाही, कारण हे फक्त फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये दिले जात आहे. यातच Nothing फोनला UFS 3.1 स्टोरेज आवृत्ती मिळण्याची अपेक्षा आहे. नथिंग फोन (2) ला 5,000 mAh बॅटरीसह 67W फास्ट चार्जिंग आणि वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळण्याची अपेक्षा आहे. डिव्हाइसला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) ला सपोर्ट करेल.
Nothing 2 ची किंमत (Nothing 2 Price)
गेल्या वर्षी लाँच केलेल्या Nothing 1 ची भारतात सुरुवातीची किंमत 32,999 रुपये होती. या फोनच्या मानाने आता लाँच होणाऱ्या Nothing 2 ची किंमत जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या