Nothing Phone (2) लवकरच भारतात होणार लॉन्च, अनेक फीचर्सची माहिती झाली लीक
Nothing Phone (2) : Nothing Phone (2) BIS सर्टिफिकेशन वेबसाइटवर स्पॉट झाला आहे. हा फोन लिस्ट झाल्यानंतर असे म्हणता येईल की हा लवकरच भारतात लॉन्चसाठी उपलब्ध होईल.
Nothing Phone (2) : Nothing Phone (2) BIS सर्टिफिकेशन वेबसाइटवर स्पॉट झाला आहे. हा फोन लिस्ट झाल्यानंतर असे म्हणता येईल की हा लवकरच भारतात लॉन्चसाठी उपलब्ध होईल. हा मध्यम रेंजचा प्रीमियम फोन आहे. या नथिंग फोनच्या लॉन्चची माहिती कंपनीचे सीईओ कार्ल पेई यांनी आधीच दिली होती. पण लॉन्चची टाइमलाइन काय असेल, हे त्यांनी सांगितले नाही. आता नथिंग फोन (2) ला बीआयएस प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यामुळे हा लवकरच लॉन्च होईल, असे म्हणता येईल. चला जाणून घेऊया फोनशी संबंधित सर्व तपशील.
Nothing Phone (2) फीचर्स
Nothing Phone (2) 120Hz रिफ्रेश रेट, AMOLED डिस्प्लेसह FHD+ रिझोल्यूशन मिळू शकतो. असे म्हटले जात आहे की, हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसरसह येऊ शकतो, ज्याला 12GB पर्यंत रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजचा सपोर्ट मिळू शकतो. UFS 4.0 स्टोरेज सोल्यूशन फोनमध्ये मिळू शकत नाही, कारण हे फक्त फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये दिले जात आहे. यातच Nothing फोनला UFS 3.1 स्टोरेज आवृत्ती मिळण्याची अपेक्षा आहे. नथिंग फोन (2) ला 5,000 mAh बॅटरीसह 67W फास्ट चार्जिंग आणि वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळण्याची अपेक्षा आहे. डिव्हाइसला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) ला सपोर्ट करेल.
Nothing Phone (2) किंमत
नथिंग फोन (2) ची किंमत नथिंग फोन (1) पेक्षा जास्त असू शकते, कारण हा अनेक अपडेटेड फीचर्ससह येऊ शातो. नथिंग फोन (1) ची भारतात सुरुवातीची किंमत 32,999 रुपये होती.
Redmi A2 and A2+ Launched: Xiaomi लॉन्च
Xiaomi ने जागतिक स्तरावर 2 बजेट स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. एक Redmi A2 आणि दुसरा Redmi A2+ आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5000mah बॅटरी आणि MediaTek Helio G36 प्रोसेसरचा सपोर्ट आहे. Redmi A2 च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला 6.52 इंच HD + LCD डिस्प्ले, MediaTek Helio G36 प्रोसेसर, 5000mah बॅटरी आणि 8 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. फ्रंटमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. दुसरीकडे Redmi A2+ बद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला त्यातही तेच स्पेक्स मिळतात. दोन्ही मोबाईल फोन 2/32GB आणि 3/32GB स्टोरेज पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. ग्राहक हे स्मार्टफोन्स ब्लॅक, लाईट ब्लू आणि लाईट ग्रीन रंगात खरेदी करू शकतील. Xiaomi ने सध्या हे स्मार्टफोन युरोपमध्ये लॉन्च केले आहेत. या स्मार्टफोन्सची किंमत अजून जाहीर करण्यात आलेली नाही, पण स्पेक्सनुसार या स्मार्टफोन्सची किंमत 10,000 रुपये असू शकते. मोबाईलच्या सुरक्षेसाठी तुम्हाला फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. हे स्मार्टफोन Android 12 वर काम करतील.