Nothing Phone 2 ची प्री-ऑर्डर सुरू, फ्लिपकार्टवर करा बुक
Nothing Phone 2 : आजपासून नथिंग फोन 2 (Nothing Phone 2) चं Flipkart वर या फोनचं प्री-बुकींग सुरु झालं आहे.
Nothing Phone 2 : सध्या विविध कंपन्यांकडून बाजारात दमदार फिचर्स असलेले नवनवीन स्मार्टफोन लाँच करण्यात येत आहेत. आता नथिंग फोन (Nothing) सीरीजचा दुसरा नथिंग फोन 2 (Nothing Phone 2) लवकरच भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात येणार आहे. त्याधी आजपासून म्हणजेच 29 जूनपासून या फोनची प्री-ऑर्डर सुरु झाली आहे. तुम्ही फ्लिपकार्टवर नथिंग फोन 2 (Nothing Phone 2) प्री-ऑर्डर करु शकता. आयफोनला टक्कर देणारा फोन असं या फोनचं ब्रँडींग करण्यात येता आहे.
आजपासून Flipkart वर Nothing Phone 2 प्री-ऑर्डर सुरु
आजपासून Nothing Phone 2 फोनची प्री-ऑर्डर सुरु झाली आहे. Nothing Phone 2 स्मार्टफोनच्या लाँच होण्याच्या अधिकृत तारखेची घोषणा करण्यात आली आहे. Nothing Phone 2 हा नवा स्मार्टफोन 11 जुलै रोजी भारत आणि जागतिक बाजारपेठेत लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स उघड केले आहेत. Nothing Phone 2 च्या प्री-ऑर्डरसाठी, 2000 रुपये भरावे लागतील. ई-कॉमर्स साइट फ्लिकर्टवर 29 जूनपासून नथिंग फोन 2 ची प्री-ऑर्डर भारतात दुपारी 12 वाजेपासून सुरु झाली आहे. यासोबतच फ्लिकर्टवर काही खास ऑफर्सही देण्यात आल्या आहेत. या स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.
प्री-ऑर्डर कशी कराल?
- नथिंग फोन 2 स्मार्टफोन प्री-ऑर्डर करण्यासाठी ग्राहकांना 29 जूनपासून नथिंगच्या वेबसाइटवर किंवा फ्लिपकार्टच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- तुम्ही 2000 रुपये भरून Nothing Phone 2 स्मार्टफोन प्री-बुक करू शकतात.
- प्री-ऑर्डरनंतर, 11-20 जुलै दरम्यान, ग्राहकांनी नथिंगच्या वेबसाइटवर किंवा फ्लिपकार्टच्या वेबसाइटला भेट देऊन त्यांचे मॉडेल व्हेरियंट निवडावं लागेल. यासोबतच पेमेंटचा पर्याय निवडावा लागेल.
Nothing Phone 2 स्मार्टफोनचे फिचर्स
- Nothing Phone 2 स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट दिसेल. या स्मार्टफोनमध्ये जुन्या फोनपेक्षा मोठी बॅटरी असणार आहे. या फोनची बाकीची रचना मागील वर्षी लाँच झालेल्या Nothing Phone 1 स्मार्टफोन सारखीच असेल.
- मीडिया रिपोर्टनुसार, Nothing Phone 2 या स्मार्टफोनमध्ये AMOLED डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले पाहायला मिळेल. तसेच यामध्ये 12GB रॅम असण्याची शक्यत आहे.
- Nothing Phone 1 स्मार्टफोनमध्ये ट्रान्सपरंट बॅक पॅनल देण्यात आलं होतं, तसेच त्याच्या खाली एलईडी लाइटिंगचा सेटअप आहे. त्यामुळे याचा लूक खूप आकर्षक दिसतो.Nothing Phone 2 स्मार्टफोनमध्येही Nothing Phone 1 स्मार्टफोनप्रमाणेच ट्रान्सपरंट बॅक पॅनल असणार आहे.