एक्स्प्लोर

सॅमसंग M सीरिजचा बजेटफ्रेंडली स्मार्टफोन Galaxy M34 भारतात लाँच; फास्ट चार्जिंग सपोर्टसह 'हे' आहेत भन्नाट फिचर्स

Samsung Galaxy M34 5G Price in India : सॅमसंगने हा स्मार्टफोन तीन कलरमध्ये लॉन्च केला आहे. ज्यामध्ये प्रिझम सिल्व्हर, मिडनाईट ब्लू आणि वॉटरफॉल ब्लू कलरचा समावेश आहे.

Samsung Galaxy M34 5G Price in India : सॅमसंगच्या (Samsung) स्मार्टफोनचं वैशिष्ट्य हे आपल्या सगळ्यांनाचा माहित आहे. कमी पैशांत जास्तीत जास्त फिचर्स उपलब्ध करून देणारा हा स्मार्टफोन तरूणाईत विशेष लोकप्रिय आहे. असाच एक स्मार्टफोन Samsung ने नुकताच भारतात लॉन्च केला आहे. Samsung Galaxy M34 5G असं या स्मार्टफोनचं नाव असून तुम्ही हा स्मार्टफोन अॅमेझॉन आणि सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवरून देखील खरेदी करू शकता. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये नेमकी कोणती वैशिष्ट्य आहेत ते जाणून घेऊयात. 

Samsung Galaxy M34 5G स्पेसिफिकेशन्स कोणते?

Samsung Galaxy M34 मध्ये 6.5-इंचाचा AMOLED डिस्प्ले फुल HD+ स्क्रीन रिझोल्यूशनसह येतो जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंट कॅमेरा 12MP उपलब्ध आहे. कंपनीने हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे ज्यात 6/128GB आणि 8/128GB चा समाविष्ट आहे. हा स्मार्टफोन Exynos 1280 SoC सह येतो. तसेच, यामध्ये तुम्हाला 25W च्या फास्ट चार्जिंगसह 6000mAh बॅटरी मिळते.

Samsung Galaxy M34 5G किंमत किती? 

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy M34 5G चा हा स्मार्टफोन अगदी बजेट फ्रेंडली आहे. या स्मार्टफोनची किंमत 16,999 रुपयांपासून सुरू होते. तुम्हाला जर हा स्मार्टफोन हवा असेल तर यामध्ये तीन कलर ऑप्शन्स देण्यात आली आहेत. ज्यामध्ये प्रिझम सिल्व्हर, मिडनाईट ब्लू आणि वॉटरफॉल ब्लू कलरचा समावेश आहे. Samsung Galaxy M34 5G ची विक्री 16 जुलैपासून सुरू होणार आहे. मात्र, तुम्ही हा स्मार्टफोन प्री-ऑर्डर देखील करू शकता. 

Oppo लवकरच लॉन्च करणार 3 नवीन स्मार्टफोन  

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo 10 जुलै रोजी भारतात Oppo Reno 10 सीरीज अंतर्गत 3 नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या सीरीज अंतर्गत Oppo Reno 10, Oppo Reno 10 pro आणि Oppo Reno 10 Pro plus स्मार्टफोन लॉन्च केले जातील. बेस व्हेरिएंट व्यतिरिक्त दोन्ही मॉडेल्सची किंमत लीक झाली आहे. लीक्सनुसार, Oppo Reno 10 pro आणि Oppo Reno 10 Pro plus ची किंमत जवळपास 40,999 रुपये आणि 54,999 रुपयांपर्यंत असू शकते.

महत्त्वाच्या बातम्या :

Threads ची धमाल! 24 तासांत सुमारे 10 कोटी पोस्ट, ट्विटरला डिवचणाऱ्या मीम्स व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Monsoon Trek : पावसाळ्यात सहलीचा आनंद लुटा, मुंबईजवळील या ट्रेकिंग पॉईंट्सना नक्की भेट द्या
पावसाळ्यात सहलीचा आनंद लुटा, मुंबईजवळील या ट्रेकिंग पॉईंट्सना नक्की भेट द्या
Indian 2 Trailer : भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Lok Sabha Speaker Election : लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी यंदा निवडणूक, 'इंडिया'कडून के. सुरेश मैदानातABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 June 2024Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरेTOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 26 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Monsoon Trek : पावसाळ्यात सहलीचा आनंद लुटा, मुंबईजवळील या ट्रेकिंग पॉईंट्सना नक्की भेट द्या
पावसाळ्यात सहलीचा आनंद लुटा, मुंबईजवळील या ट्रेकिंग पॉईंट्सना नक्की भेट द्या
Indian 2 Trailer : भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
Embed widget