एक्स्प्लोर

लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर

Needly SOS : लाडक्या बहिणींना सुरक्षित करण्यासाठी अहिल्यानगर येथील माजी नगरसेवकाने मोबाईल ॲप तयार केले आहे.

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीआधी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुती सरकारने (Mahayuti Government) लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली होती. सरकारच्या माध्यमातून या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना सुरु करण्यात आली.  या योजनेत 2 कोटीहून अधिक महिलांना समाविष्ट करण्यात आले आहे. महायुतीसाठी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महिलांनी महायुतीला भरघोस मतदान केले आहे. आता लाडक्या बहिणींना सुरक्षित करण्यासाठी अहिल्यानगर (Ahilyanagar News) येथील माजी नगरसेवक निखिल वारे (Nikhil Ware) यांनी एक मोबाईल ॲप (Mobile Application) डेव्हलप केले आहे. 

या ॲपच्या माध्यमातून शिक्षणासाठी नगर शहरात येणाऱ्या विद्यार्थिनी शहरातील महिला आणि जेष्ठ नागरिक यांना संकटाच्या काळात आपल्या जवळच्या चार व्यक्तींना मदत मागता येणार आहे. निडली एस ओ एस  नावाचे हे ॲप्लिकेशन शहरातील सावेडी उपनगरातील महिलांना मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मोबाईल ॲपची सध्या अहिल्यानगरमध्ये जोरदार चर्चा होत आहे.  

कसे काम करते निडली एस ओ एस? 

महिला किंवा युवतींना असुरक्षिततेची भावना तयार होईल किंवा कुठल्याही संकटाची जाणीव झाल्यास मोबाईलमध्ये असलेल्या निडली एस ओ एस या ॲप्लिकेशन वापर करून जवळच्या चार नातेवाईकांना आपोआप मेसेज पाठविला जातो. त्याचप्रमाणे महिला किंवा युवतींचे लाईव्ह लोकेशन देखील नातेवाईकापर्यंत पाठविता येते. लोकेशन ट्रॅक करून संकटग्रस्त मुलींपर्यंत पोहोचण्यास या मोबाईल ॲपच्या माध्यमातून मदत होते. 

मोबाईलमध्ये वाजणार सायरन

संकटाच्या काळात मोबाईल हाताळता आला नाही तर केवळ व्हॅल्यूम बटन हे तीन ते चार वेळेला दाबले तरीदेखील जवळच्या व्यक्तींना मेसेज जाणार आहे. सोबतच मोबाईलमध्ये सायरन देखील वाजणार आहे. या पद्धतीचं ॲप तयार करण्यात आले आहे. राज्यात हे ॲप पहिल्यांदाच अहिल्यानगर जिल्ह्यात वापरले जाणार असल्याचा दावा माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात? विविध राज्यांना किती खर्च येणार?

Ladki Bahin Yojana: पिंपरी-चिंचवडमधील तब्बल 'एवढ्या' महिल्या लाडकी बहीण योजनेतून ठरल्या अपात्र, काय आहे कारण?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election Result 2026: पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर
पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर
BMC Election Result 2026: उमेदवारी अर्जासाठीही उधार पैसे घेत निवडणूक लढला, ओवैसींचा विश्वास सार्थकी लावत दणदणीत विजय; मुंबईतील MIMचा हिंदू नगरसेवक कोण?
उमेदवारी अर्जासाठीही उधार पैसे घेत निवडणूक लढला, ओवैसींचा विश्वास सार्थकी लावत दणदणीत विजय; मुंबईतील MIMचा हिंदू नगरसेवक कोण?
Chhatrapati Sambhajinagar MIM Winner List: गुलमंडीसारख्या शिवसेनेच्या गडातही उमेदवारांची बाजी; काकासाहेब काकडे ते सुनीता वाहुळ, संभाजीनगरमधील MIM चे नगरसेवक कोण कोण?
गुलमंडीसारख्या शिवसेनेच्या गडातही उमेदवारांची बाजी; काकासाहेब काकडे ते सुनीता वाहुळ, संभाजीनगरमधील MIM चे नगरसेवक कोण कोण?
Malegaon Election Result 2026 : मालेगावकरांनो 'हे' आहेत तुमच्या महापालिकेतील 84 नवनिर्वाचित नगरसेवक, इस्लाम पार्टीचे 35, एमआयएमचे किती? पाहा यादी
मालेगावकरांनो 'हे' आहेत तुमच्या महापालिकेतील 84 नवनिर्वाचित नगरसेवक, इस्लाम पार्टीचे 35, एमआयएमचे किती? पाहा यादी

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Election Result 2026: पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर
पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर
BMC Election Result 2026: उमेदवारी अर्जासाठीही उधार पैसे घेत निवडणूक लढला, ओवैसींचा विश्वास सार्थकी लावत दणदणीत विजय; मुंबईतील MIMचा हिंदू नगरसेवक कोण?
उमेदवारी अर्जासाठीही उधार पैसे घेत निवडणूक लढला, ओवैसींचा विश्वास सार्थकी लावत दणदणीत विजय; मुंबईतील MIMचा हिंदू नगरसेवक कोण?
Chhatrapati Sambhajinagar MIM Winner List: गुलमंडीसारख्या शिवसेनेच्या गडातही उमेदवारांची बाजी; काकासाहेब काकडे ते सुनीता वाहुळ, संभाजीनगरमधील MIM चे नगरसेवक कोण कोण?
गुलमंडीसारख्या शिवसेनेच्या गडातही उमेदवारांची बाजी; काकासाहेब काकडे ते सुनीता वाहुळ, संभाजीनगरमधील MIM चे नगरसेवक कोण कोण?
Malegaon Election Result 2026 : मालेगावकरांनो 'हे' आहेत तुमच्या महापालिकेतील 84 नवनिर्वाचित नगरसेवक, इस्लाम पार्टीचे 35, एमआयएमचे किती? पाहा यादी
मालेगावकरांनो 'हे' आहेत तुमच्या महापालिकेतील 84 नवनिर्वाचित नगरसेवक, इस्लाम पार्टीचे 35, एमआयएमचे किती? पाहा यादी
प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपला आज राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार; चेहरा सुद्धा ठरला; सहा महिन्यांत तीन प्रदेशाध्यक्ष बिनविरोध
प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपला आज राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार; चेहरा सुद्धा ठरला; सहा महिन्यांत तीन प्रदेशाध्यक्ष बिनविरोध
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
BMC Elections 2026: मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
Eknath Shinde BMC Election 2026: एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
Embed widget