Scott Hall dies at 63: डब्लूडब्लूई चाहत्यांसाठी वाईट बातमी, सुपरस्टार स्कॉट हॉल यांचं निधन
Scott Hall Dies at 63: स्कॉट हॉल हे गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. स्कॉट यांना तीन हार्ट अॅटक आले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
Scott Hall Dies at 63: डब्लूडब्लूडब्लू चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आलीय. डब्लूडब्लूईचे सुपरस्टार स्कॉट हॉल यांचं निधन झालंय. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. स्कॉट हॉल हे गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. स्कॉट यांना तीन हार्ट अॅटक आले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
स्कॉट हॉलची गणना डब्लूडब्लूईमधील सर्वात मोठ्या सुपरस्टारमध्ये केली जाते. त्यांनी डब्लूडब्लूई वर्ल्ड चॅम्पियनशिपचे दोन खिताब जिंकले होते. स्कॉट हॉल यांना काही वेळापूर्वी हिप इंजरी झाली. त्यानंतर त्यांची प्रकृती सतत खराब होत गेली.
स्कॉट हॉलनं यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1958 रोजी अमेरिकेत झाला. त्यांनी 1984 मध्ये पहिला रेसलिंग सामना खेळला होता. त्यानंतर 1991 मध्ये ते वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसलिंगमध्ये सामील झाले. 1992 मध्ये स्कॉट हॉल यांना डब्लूडब्लूईनं साईन केलं. रिंगमध्ये त्याला रेझर रेमन म्हणून ओळखला जाऊ लागले. स्कॉट हॉल यांनी डब्लूडब्लूईमध्ये चार वेळा इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियनचे विजेतेपद पटकावलं होतं. त्यांनी 1995 मध्ये समरस्लॅम आणि रेसलमेनिया येथे स्कॉट हॉलच्या केविन नॅश, ब्रेट हार्ट, शॉन मायकेल्ससह अनेक मोठ्या डब्लूडब्लू स्टार खेळाडूंशी स्पर्धा केली.
दरम्यान, स्कॉट हॉल यांची पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसलिंगमध्ये निवड करण्यात आली होती. त्यानंतर स्कॉट हॉलनं निवृत्ती घेतली. निवृत्त झाल्यानंतर स्कॉट हॉलची डब्लूडब्लू हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. स्कॉट हॉलच्या निधनानं डब्लूडब्लईच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. स्कॉट हॉलच्या निधनाबद्दल अनेक डब्लूडब्लूई स्टार खेळाडूंनी शोक व्यक्त केलाय.
हे देखील वाचा-
- IND vs SL : धोनीने सुरु केलेली परंपरा विराटनंतर रोहितनेही कायम ठेवली!
- झुकेगा नहीं! दहा वर्षांपासून भारत मायदेशात ‘अपराजीत’, आठ संघांना चारली धूळ
- IPL 2022 : कर्णधार आणि माजी कर्णधार करतील आरसीबीकडून ओपनिंग, अशी असेल बंगळुरुची अंतिम 11
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha