IPL 2022 : कर्णधार आणि माजी कर्णधार करतील आरसीबीकडून ओपनिंग, अशी असेल बंगळुरुची अंतिम 11
आगामी आयपीएलसाठी विराट कर्णधार नसल्याने आरसीबीने कर्णधारपदाची धुरा फाफ डुप्लेसीस याच्याकडे दिली आहे.
IPL 2022, RCB Playing 11: इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या सीजनला काही दिवसांत सुरुवात होणार आहे. सामन्यांना 15 दिवसांहून कमी वेळ शिल्लक असताना आता सर्वच संघांनी सराव जोरदार सुरु केला आहे. दरम्यान अनेक संघाचे कर्णधारही बदलले असून आरसीबीने देखील फाफ डुप्लेसीसला कर्णधार केलं आहे. त्यामुळे आता आरसीबी संघाची रणनीतीही बदलणार आहे.
फाफ आणि कोहली सलामीला
रॉयल चँलेंजर्स बंगळुरुने आयपीएल 2022 साठी फाफ डू प्लेसिसला कर्णधार केल्याने आता तो सलामीला उतरणार आहे. सोबत विराट कोहली मैदानात पाहायला मिळेल. त्यामुळे सलामीला विराट-फाफ जोडी दिसणार आहे.
अशी असे मिडल ऑर्डर
तिसऱ्या क्रमांकावर युवा फलंदाज अनुज रावत खेळू शकतो. रावतला आरसीबीने 3.40 कोटींना विकत घेतलं आहे. तर चार नंबरवर ग्लेन मॅक्सवेल आणि पाच नंबरला दिनेश कार्तिक मैदानात येईल. मॅक्सवेलने आयपीएल 2021 मध्ये दमदार प्रदर्शन केलं होतं.
अशी असे गोलंदाजी
फिरकी गोलंदाजीची जबाबदारी ऑलराऊंडर शाहबाज अहमद आणि वानिंदु हसरंगा यांच्यावर असेल. तर वेगवान गोलंदीजी हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवुड याच्यावर असेल.
आरसीबीची संभाव्य अंतिम 11- फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि जोश हेजलवुड.
हे देखील वाचा-
- Kapil Dev : भारताचे महान ऑलराऊंडर कपिल देव यांचा आवडता ऑलराऊंडर खेळाडू माहित आहे का?
- Virat Kohli : कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी चाहते मैदानात, पुढे विराटने जे केले ते तुम्हीच पाहा
- IND vs SL Test : श्रेयस अय्यरची दमदार कामगिरी, अर्धशतक ठोकत नवा रेकॉर्ड केला नावावर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha