Who Is Carlos Alcaraz: वय 20 वर्ष, जिंकलं पहिलं विम्बल्डन; जोकोविचच्या हातून पाचवं विम्बल्डन हिसकावणारा स्पॅनिश टेनिसपटू अल्कारेझ कोण?
Who Is Carlos Alcaraz: अवघ्या 20 वर्षांच्या कार्लोस अल्कारेझनं अनुभवी जोकोविचला नमवत आपल्या कारकिर्दीतील पहिलं विम्बल्डन पटकावला.
Who Is Carlos Alcaraz: कार्लोस अल्कारेझनं (Carlos Alcaraz) विम्बल्डन 2023 चं (Wimbledon 2023) विजेतेपद पटकावलं. अल्कारेझनं अंतिम फेरीत सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा (Novak Djokovic) पराभव केला. पाचव्या सेटमध्ये जोकोविचचा पराभव करून त्यानं आपलं पहिलं विम्बल्डन विजेतेपद पटकावलं. अल्कारेझ हा स्पॅनिश टेनिसपटू आहे. अल्कारेझ हा सध्या ATP (Association of Tennis Professionals) मध्ये नंबर वन खेळाडू आहे. अल्कारेझनं याआधी वयाच्या 19 व्या वर्षी यूएस ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं.
स्पॅनिश टेनिसपटू अल्कारेझ हा स्पेनमधील एल पालमार या गावातील रहिवाशी आहे. त्याचा जन्म 5 मे 2003 मध्ये झाला. अल्कारेझचे वडील टेनिसचे धडे द्यायचे, त्यांच्या अॅकॅडमीमधूनच अल्कारेझनं टेनिसचे धडे गिरवले. त्यानं अनेक स्पॅनिश आणि युरोपियन चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत. अल्काराझनं त्याचा पहिला एटीपी सामना रामोस विनोलास विरुद्ध जिंकला होता, तेव्हा अल्कारेझ अवघ्या 16 वर्षांचा होता. जगातील नंबर एकचा माजी खेळाडू जुआन कार्लोस फेरेरो त्याचा ट्रेनर आहे. फरेरो 15 व्या वर्षापासूनच फेरेरोसोबत टेनिसचा सराव करत आहे.
अल्कारेझ हा एटीपीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला चौथा स्पॅनिश खेळाडू आहे. यापूर्वी नदाल, कार्लोस मोया आणि अल्कारेझचा गुरू जुआन कार्लोस फेरेरो यांनी हे मानांकन मिळवलं आहे. अल्कारेझनं नोव्हाक जोकोविचला एटीपी गेममध्ये पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यानं माद्रिद ओपनच्या उपांत्य फेरीत जोकोविचचा पराभव केला होता. अल्कारेझ आणि जोकोविच यांच्यात एकूण तीन सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये अल्कारेझ 2-1 नं आघाडीवर आहे.
अल्कारेझनं अनुभवी जोकोविचला नमवलं. हे त्याचं दुसरं ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरलं. यापूर्वी त्यानं यूएस ओपन 2022 चं विजेतेपद पटकावलं होतं. 2021 मध्ये यूएस ओपनमधील ओपन एरातील अल्कारेझ हा सर्वात कमी वयाच्या पुरुष गटातील उपांत्यपूर्व फेरीचा खेळाडू ठरला. 2022 मध्ये, तो राफेल नदाल आणि जोकोविचला पराभूत करणारा पहिला टीनएजर बनला. एटीपीमध्ये अव्वल क्रमांक मिळवणारी अल्कारा ही सर्वात तरुण खेळाडू आहे.
24वं ग्रँडस्लॅम जोकोविचच्या हातून निसटलं
36 वर्षीय नोव्हाक जोकोविचला 24वं ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. जोकोविचनं फायनल जिंकली असती, तर त्याचे हे सलग पाचवं विम्बल्डन विजेतेपद ठरलं असतं. पण स्पेनचा युवा खेळाडू कार्लोस अल्कारेझनं जोकोविचच्या स्वप्नांवर पाणी फेरलं.
अंतिम सामना पाहण्यासाठी राजेशाही कुटुंबाचीही उपस्थिती
नोव्हाक जोकोविच आणि कार्लोस अल्कारेझ यांच्यातील विम्बल्डन फायनल पाहण्यासाठी राजघराणं आलं होतं. प्रिन्सेस डायना, केट मिडलटन आणि प्रिन्स विल्यम तसेच त्यांची दोन मुलं प्रिन्सेस शार्लोट आणि प्रिन्स जॉर्जही टेनिस कोर्टवर उपस्थित होते. राजघराण्यातील काही अप्रतिम छायाचित्रंही कोर्टातून व्हायरल होत आहेत. प्रिन्स जॉर्ज आणि प्रिन्सेस शार्लोट या खेळाचा पुरेपूर आनंद घेत होते. मात्र, अल्कारेझनं अंतिम फेरीत टेनिसमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या जोकोविचला पराभूत करून शानदार कामगिरी केली. या पराक्रमासाठी तो कायम स्मरणात राहील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :