एक्स्प्लोर

सूर्यकुमारने टीपलेला झेल नव्हे तर सिक्सर? डेव्हिड मिलर बाद नव्हता? सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत वेगवेगळे दावे!

सूर्यकुमार यादने डेव्हिड मिलरचा झेल टिपल्यानंतर सामना खऱ्या अर्थाने फिरला. याच कॅचमुळे भारताचा विजयाचा मार्ग सोपा झाला.

Suryakumar Yadav David Miller Catch : टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला चारी मुंड्या चित केलं. भारताचा या सामन्यात सात धावांनी विजय झाला. दरम्यान, या सामन्यात सूर्यकुमार यादवने टीपलेल्या एका झेलमुळे भारताचा विजय सोपा झाला. या अफलातून कामगिरीमुळे त्याची देशभरात वाहवा केली जात आहे. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. मात्र त्याने घेतलेल्या याच कॅचवर सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्या कॅचचे काही व्हिडीओ शेअर करून सोशल मीडियावर थर्ट अम्पायरने दिलेल्या निर्णयावर शंका व्यक्त केली जात आहे. 

सामन्यात नेमकं काय घडलं? 

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलरने टीम इंडियाची चिंता वाढवली होती. अक्षर पटेलच्या पंधराव्या षटकात क्लासेनने चौकार षटकार लगावत सहा चेंडूमध्ये एकूण 24 धावा मिळवल्या. त्यानंतर क्लासेन बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलरनेही मोठे फटके मारायला सुरुवात केली होती. शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 16 धावा हव्या होत्या. पण पहिल्याच चेंडूवर मिलर झेलबाद झाला. सूर्यकुमार यादवने थेट सीमारेषेवर हा झेल टीपून मिलरला तंबूत पाठवलं आणि भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या. मिलर बाद झाल्यामुळे भारताचा विजय पक्का झाला. पण सूर्यकुमारच्या या झेलवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

नेमका काय दावा केला जातोय

सूर्यकुमार यादवच्या या झेलबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. यामध्ये सूर्यकुमारने जेव्हा झेल टीपला तेव्हा त्याचा एक पाय सीमारेषेला लागला होता असं सोशल मीडियावर म्हटलं जातंय. असा दावा करणारे अंतिम सामन्यातील काही फोटो आणि व्हिडीओदेखील शेअर करत आहेत. विशेष म्हणजे सूर्यकुमारच्या कॅचबाबतचा पंचांचा निर्णयही चुकला आहे, असं काहीजण म्हणत आहेत. सूर्युकमारच्या हातात जेव्हा चेंडू होता, तेव्हा त्याचा एक पाय सीमारेषेवर लागल्याचे दिसत आहे. थर्ड अम्पायरच्या चुकीमुळे दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला, असा दावा एका नेटकऱ्याने केला आहे.

खरंच डेव्हिड मिलर बाद नव्हता?

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओंमध्ये काहीही तथ्य नाही. कारण प्रत्यक्ष मैदानात अनेक कॅमेऱ्यांमध्ये सामना रेकॉर्ड केला जातो. प्रत्येक अँगलने सामन्यातील क्षण टिपून त्याच्याच आधारे थर्ट अम्पायर निर्णय देतो, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

हेही वाचा :

'टू ट्रॉफी इन वन फ्रेम', सूर्यादादाच्या पत्नीसोबतच्या खास फोटोंची सोशल मीडियावर चर्चा!

Virat Kohli Net Wealth : टीम इंडियाला विजय मिळवून देणारा विराट कोहली किती कोटींचा मालक?

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

India vs Pakistan : पाकिस्तानकडून टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव अन् तिलक वर्माचा संताप! कर्णधाराने पराभवाचे खापर कोणावर फोडले?, थेट नाव घेतलं
पाकिस्तानकडून टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव अन् तिलक वर्माचा संताप! कर्णधाराने पराभवाचे खापर कोणावर फोडले?, थेट नाव घेतलं
India vs Pakistan : एकटं पाहून पाकिस्तानने हर्षित राणाला गाठलं, 11 खेळाडूंनी घेरलं! मग कर्णधार तिलक वर्मा संतापला, पुढे जे घडलं ते पाहून सारेच थक्क, पाहा VIDEO
एकटं पाहून पाकिस्तानने हर्षित राणाला गाठलं, 11 खेळाडूंनी घेरलं! मग कर्णधार तिलक वर्मा संतापला, पुढे जे घडलं ते पाहून सारेच थक्क, पाहा VIDEO
IND vs PAK सामन्यात नवा वाद! पंचांनी डेड बॉल दिला अन् पाकिस्तानी खेळाडू अंगावर धावून गेले, सगळ्यांनी अंपायरला घेरलं! नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
IND vs PAK सामन्यात नवा वाद! पंचांनी डेड बॉल दिला अन् पाकिस्तानी खेळाडू अंगावर धावून गेले, सगळ्यांनी अंपायरला घेरलं! नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
IND vs NZ 1st Test : एकामागोमाग दोन धक्के! पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा कहर, न्यूझीलंडची कोंडी, कसोटी जिंकण्यासाठी इतक्या विकेट्सची गरज
एकामागोमाग दोन धक्के! पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा कहर, न्यूझीलंडची कोंडी, कसोटी जिंकण्यासाठी इतक्या विकेट्सची गरज

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bisleri water FSSAI: मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Sujay Vikhe Patil : शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
Maharashtra Live blog updates: एल निनोमुळे हिंदुकुश हिमालयात पूर, भूस्खलन आणि हिमस्खलनाचा धोका
Maharashtra Live blog updates: एल निनोमुळे हिंदुकुश हिमालयात पूर, भूस्खलन आणि हिमस्खलनाचा धोका
PM Modi Speech :
"1,000 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर"; गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा दावा
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
Embed widget