Virat Kohli Net Wealth : टीम इंडियाला विजय मिळवून देणारा विराट कोहली किती कोटींचा मालक?
Virat Kohli Net Worth : विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. टीम इंडियाचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
Virat Kohli Assets : भारताने टी-20 विश्वचषक जिंकला आहे. गेल्या 10 वर्षांपासूनचं कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. भारताने दक्षिण आफ्रेकाला 7 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात विराट कोहलीने भारतीय संघाला संकटातून बाहेर काढण्याचं काम केलं. भारताला विजय मिळवून देत त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. दरम्यान, विराट कोहलीचे भारतासह जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. त्याने निवृत्ती घेतल्यानंतर कोट्यवधीने फॅन्स असलेला किंग कोहलीच्या संपत्तीची चर्चा होत आहे. तो किती कोटींचा मालक आहे? असे विचारले जातेय.
विराट कोहलीने ठोकल्या 76 धावा (Virat Kohli Runs in IND Vs SA)
भारताचा विजय कोणा एका खेळाडूमुळे झालेला नाही. हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, अशा पट्टीच्या खेळाडूंमुळे भारताला विजयापर्यंत मजल मारता आली. पण विराट कोहलीने नेत्रदीपक कामगिरी करून संघाला सावरलं. त्याने 59 चेंडूंत दोन षटकार आणि सहा चौकार लगावत 76 धावा केल्या.
विराट कोहली कोणकोणत्या माध्यमातून कमवतो? (Virat Kohli income source)
विराट कोहली हा क्रिकेट जगतातील किंग म्हणून ओळखला जातो. मैदानावर उतरल्यानंत त्याच्यातील उर्जा अनेकांचा उत्साह वाढवणारी असते. फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण यामध्ये त्याने नेहमीच पूर्ण क्षमतेने खेळ खेळण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे तो भारताच्या क्रिकेट विश्वातील सर्वाधिक यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. क्रिकेटमध्ये यशस्वी ठरलेला हा विराट आर्थिक क्षेत्रातही सजग आहे. त्याने वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे. या गुंतवणुकीतून तो कोट्यवधी रुपये कमतवो. तसेच अनेक कंपन्यांच्या जाहिराती करूनही तो चांगले पैसे कमवतो.
विराट कोहलीची संपत्ती नेमकी किती? (What is Virat Kohli Net Property)
विराट कोहली हा वेगवेगळ्या माध्यमातून पैसे कमवतो. एकट्या क्रिकेटमधून त्याला प्रत्येक महिन्याला 1.3 कोटी रुपये मिळतात, असे म्हटले जाते. विराट कोहलीचा बीसीसीआयसोबत करार आहे. तो आयपीएलमध्ये रॉल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळतो या सामन्यांतून त्याला कोट्यवधी रुपये मिळतात. जाहिरातीच्या माध्यमातून त्याल 7 ते 10 कोटी रुपये मिळतात, असे म्हटले जाते. विराट कोहलीच्या मालकीचे चिसेल नावाचे एक फिटनेस सेंटर आहे. तसचे Wrong या नावाचे एक फॅशन लेबलही त्याच्या मालकीचे आहे. अन्य अनेक उद्योग, व्हेंचर्समध्येही त्याची गुंतवणूक आहे. टेक स्टार्टअप्स, रेस्टॉरंट्समध्येही त्याने गुंतवणूक केलेली आहे.
विराट कोहलीकडे आलिशान, महागडी घरं (Virat Kohli Car Collection)
विराट कोहलीचे मुंबईतील वरळी परिसरात एक आलिशान अपार्टमेंट आहे. त्याच्या मुंबईतील या घराची किंमत 34 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. गुरगावमध्येही त्याने घरात गुंतवणूक केलेली आहे. या घराची किंमत 80 कोटी असल्याचे सांगितले जाते. अलिबागमध्येही त्याचे एक फार्महाऊस आहे. विराट कोहलीकडे कोट्यवधी किंमत असलेल्या गाड्या आहेत. यामध्ये ऑडी, बेंटली, रेंज रोव्हर अशा कारचा समावेश आहे. त्याच्याकडे रोलेक्स, Patek Philippe या ब्रँडच्या महागड्या घड्या आहेत.
विराट कोहलीची एकूण संपत्ती किती? (Virat Kohli Net Asset)
विराट कोहलीची एकूण संपत्ती ही 126 दशलक्ष म्हणजेच साधारण 1033 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.
हेही वाचा :