एक्स्प्लोर
Advertisement
...तर मी पुन्हा रुबलला 19वी ओव्हर देईन : शाकिब
'अशाप्रकारची फलंदाजी इतिहासात फार कमी वेळा झाली आहे. ही फलंदाजी खरंच चमत्कारिक होती. पण कार्तिकने तसं केलं आहे. पहिल्या दोन चेंडूंमध्ये 10 धावा दिल्यानंतर आम्ही सगळेच घाबरलो होतो. पण आता भविष्यात अशीच परिस्थिती आली तर मी पुन्हा रुबलाच गोलंदाजी देईन.'
कोलंबो : टी-20 तिरंगी मालिकेत भारताने बांगलादेशचा हातून विजयाच्या घास अक्षरश: हिसकावून घेतला. हा पराभव बांगलादेशचा प्रचंड जिव्हारी लागला आहे. पण या पराभवाने कर्णधार शाकिब अल हसन अजिबात खचलेला नाही. 'भविष्यात पुन्हा अशीच वेळ आली तर मी पुन्हा 19वी ओव्हर रुबेल हुसैनलाच देईल.' असं म्हणत शाकिबनं रुबेलची पाठराखण केली आहे.
टी-20 तिंरगी मालिकेच्या अंतिम सामन्यात दिनेश कार्तिकने 19व्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा फटकावल्या आणि इथूनच सामना बांगलादेशचा हातून निसटला.
कार्तिक जेव्हा फलंदाजीसाठी मैदानावर आला त्यावेळी भारताचा स्कोअर 18 ओव्हर आणि 133 धावा होता. भारताला विजयासाठी शेवटच्या दोन ओव्हरमध्ये तब्बल 34 धावा हव्या होत्या. त्यावेळी 19वी ओव्हर टाकण्यासाठी कर्णधार शाकिबने रुबलच्या हाती चेंडू सोपवला. पण दिनेश कार्तिकने तुफान फटकेबाजी करत या ओव्हरमध्ये 22 धावा केल्या. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत कार्तिकने भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
दरम्यान, या संपूर्ण मॅचबाबत शाकिब डेली स्टारशी बोलताना असं म्हणाला की, 'प्रामाणिकपणे सांगू तर त्याने आम्ही ठरवलेल्या डावपेचाविरुद्ध काहीही केलं नाही. मला वाटलं नव्हतं की, कार्तिक पहिल्याच चेंडूवर सिक्स दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर सिक्स मारेल.'
'अशाप्रकारची फलंदाजी इतिहासात फार कमी वेळा झाली आहे. ही फलंदाजी खरंच चमत्कारिक होती. पण कार्तिकने तसं केलं आहे. पहिल्या दोन चेंडूंमध्ये 10 धावा दिल्यानंतर आम्ही सगळेच घाबरलो होतो. पण आता भविष्यात अशीच परिस्थिती आली तर मी पुन्हा रुबलाच गोलंदाजी देईन.' असं शाकिब यावेळी म्हणाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement