एक्स्प्लोर
विराटकडून शाहीद आफ्रिदीच्या संस्थेसाठी बॅट गिफ्ट
दरम्यान आफ्रिदीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही टीम इंडियाने कर्णधार विराट कोहलीची जर्सी त्याला भेट दिली होती
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीच्या संस्थेसाठी बॅट गिफ्ट दिली आहे. शाहीद आफ्रिदीने ट्विटरवर या बॅटचा फोटो शेअर करुन माहिती दिली.
दरम्यान आफ्रिदीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही टीम इंडियाने कर्णधार विराट कोहलीची जर्सी त्याला भेट दिली होती, ज्यावर टीम इंडियाच्या खेळाडूंची स्वाक्षरी होती. एका पाकिस्तानी पत्रकाराने हा फोटो ट्विटरवर शेअर केला होता.
https://twitter.com/SAfridiOfficial/status/892343260034850816
तुमच्यासोबत खेळणं हा नेहमीच सर्वोत्तम अनुभव होता, असं विराटच्या जर्सीवर लिहिलेलं होतं. या जर्सीवर कोहलीसोबत, युवराज सिंह, आशीष नेहरा, जसप्रीत बुमरा, सुरेश रैना, पवन नेगी, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, हार्दिक पांड्या आणि टीम इंडियाचे माजी संचालक रवी शास्त्री यांची स्वाक्षरी होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement